google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी‍! राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे ८० आमदार देणार राजीनामा

Breaking News

मोठी बातमी‍! राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे ८० आमदार देणार राजीनामा

मोठी बातमी‍! राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे ८० आमदार देणार राजीनामा

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री बदलण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्षांनी मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांना निरीक्षक आणि प्रभारी म्हणून पाठवलं आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह दोन्ही निरीक्षक हॉटेलमधून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. विधीमंडळ पक्षाची बैठक काही वेळात सुरू होऊ शकते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह २५ आमदारही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत.

गेहलोत यांना पाठिंबा देणारे आमदार राजीनामा देऊ शकतात
इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहलोत गटाचे सर्व आमदार विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या घरी जाऊ शकतात. गेहलोत समर्थक आमदार सामूहिक राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. सुमारे ८० आमदारांनी त्यांचे राजीनामे लिहिले असून ते सर्व सभापतींच्या घरी नेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Post a Comment

0 Comments