google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

Breaking News

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

पुणे : राष्ट्रीय तपास एजन्सीने पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवरील छापेमारीविरोधात काल पुण्यात आंदोलन केले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली. याचा व्हीडीओ देखील व्हायरल झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणा-या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर काही आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी मात्र या घटनेवर मौन बाळगले आहे. पोलिसांकडून या व्हीडीओबाबत आणि त्यात देण्यात आलेल्या घोषणाबाजीबाबत अद्याप कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण याप्रकरणी पीएफआयचा कार्यकर्ता रियाज सय्यद याच्यासह ६० ते ७० इतर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अनधिकृतरीत्या निषेध आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेसंदर्भात भाजपच्या नेत्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. आमदार राम सातपुते यांनी पुणे पोलिस, राज्याचे पोलिस महासंचालक आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले की, ‘पुण्यात पीएफआयच्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणा-या पिलावळीला पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करावेत. देशद्रोही जिहादी प्रवृत्तीची गय करता कामा नये.

Post a Comment

0 Comments