google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्याचे लोकप्रिय “डाॅ.बाबासाहेब देशमुख साहेब हे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत- युवा नेते उमेश दादा लवटे

Breaking News

सांगोला तालुक्याचे लोकप्रिय “डाॅ.बाबासाहेब देशमुख साहेब हे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत- युवा नेते उमेश दादा लवटे

 सांगोला तालुक्याचे लोकप्रिय “डाॅ.बाबासाहेब देशमुख साहेब हे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत- युवा नेते उमेश दादा लवटे

सद्या सांगोला तालुक्यात महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना प्रदेश अध्यक्ष माननीय डॉ बाबासाहेब देशमुख यांची लोकप्रियता वाढत आहे.

ते गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. डॉ बाबासाहेब देशमुख साहेब आहेत यांचे शिक्षण हे डाॅक्टरकीचे झाले असताना‌‌सुध्दा ते सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत त्यांना या सांगोला तालुक्यातील जनतेची आस निर्माण झालेली आहे .

डॉ बाबासाहेब देशमुख साहेब हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून लोकांच्या सेवेत आहेत गोरगरीब जनतेची अडचणी सोडविण्यासाठी ते आपल्या सांगोला तालुक्यात दाखल आहेत गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्या देशावर खूप मोठे कोरोनाचे संकट होते असल्या भयंकर संकटात सुद्धा त्यांनी आपल्या सांगोला तालुक्यातील जनतेची पाठराखण केली प्रत्येक माणसाच्या संपर्कात राहून सर्वांशी संपर्क करून सर्वांची विचारपूस करत होते सर्वांना धीर देत होते 

अशा या भयंकर परिस्थिती मध्ये त्यांनी कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीवर मात करत आपल्या जनतेची सेवा केली आहे डॉ बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या घराचे दरवाजे नेहमी जनतेसाठी खुले असतात जसे आपले आबासाहेबांन दिवसरात्र काम करायचं तसेच काम डॉ बाबासाहेब ही करतात.

डॉ बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या सारखे नेतृत्व आपल्याला मिळाले आपले खूप मोठे भाग्य आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांचा संपर्क आहे सर्वांच्या सुख दुःखात ते सामिल असतात त्यामुळे मी सांगोला तालुक्यातील सर्व जनतेला एवढीच विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीत आपण डॉ बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे खूप गरजेचे आहे त्यांनी कधी स्वताचा विचार ही केला नाही मध्यंतरी ते आजारी असताना त्यांना डेंगू या आजाराची लक्षणे दिसून आले 

आणि ते पाॅजीटीव आले 21 दिवस ते आपल्या पेनूर या गावी असताना सुद्धा सांगोला तालुक्यातील जनता त्यांना भेटण्यासाठी पेनूर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जात होती आणि आधार देत होती काल आपण बघीतले असेल की आजारातून मुक्त झाल्यानंतर ते सांगोला तालुक्यात परत येत असताना त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनता सांगोल्यात उपस्थित होती


दिवंगत लोकप्रिय आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांची झलक डॉ बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये दिसत आहे

१) आबासाहेब व बाबासाहेब कामाची‌ एकच पध्दत आहे

२)आबासाहेबासारखा सखोल अभ्यास डॉ बाबासाहेब यांचा‌ आहे

३) सर्व प्रश्नांची‌ जाण

४) प्रत्येक गावामध्ये मोठा जनसंपर्क

५)एवढा जनसंपर्क आसणारा व तो कायम ठेवणारा एकमेव युवा नेता बाबासाहेब

६) दिवसातले १६/१६ तास काम करणारा‌ नेता

७) कोणालाही रागाने द्वेषाने बोलणार नाही

८) मतदार संघातील हजारो युवकांना नावानिशी ओळखणारा नेता डॉ बाबासाहेब‌*

९) संपुर्ण मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा नेता

चर्चा तर काहीही होवोत‌ परंतु युवकांच्या मनावरची अधिराज्य गाजवणारे बाबासाहेब आहेत हे मात्र नक्की

असे डॉ बाबासाहेब देशमुख साहेब यांच्यावरती बोलण्यासारखं खूप काही आहेत जी आबासाहेबांची राजकारणाची आणि समाजकारणाची पद्धत होती तीच पद्धत जनता डॉ बाबासाहेब देशमुख साहेब यांच्यामध्ये जनतेला दिसून आली आबासाहेब यांचे कार्य आख्या महाराष्ट्रला माहीत आहे तीच पद्धत आपण डॉ बाबासाहेब देशमुख साहेब यांच्यामध्ये बघत आहोत त्यामुळे सांगोला तालुक्यातील जनतेला एकच कळकळीची विनंती करत आहोत 

की डॉ बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येणारी 2024 च्या निवडणूकीत आपण त्यांना आमदार करून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना आशिर्वाद द्यायचे आहेत‌ मी काय खूप मोठा कार्यकर्ता नाही परंतु डॉ बाबासाहेब देशमुख साहेब यांचे कार्य पाहुन त्यांचा आदर्श घेऊन समाजकारणाची आणि राजकरणाची वाटचाल पुढे करत आहे असे अनेक‌ तरुण डॉ बाबासाहेब यांचा‌ आदर्श घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत या कामात आपण सर्वांनी एकमताने स्व.आबासाहेबांचे विचार डाॅ.बाबासाहेब देशमुख हे घराघरात पोहोचवत आहेत

 त्यांच्या पाठीशी आपण तरुणांनी‌ खंबीरपणे उभे राहुया..आपला पक्ष हा महाराष्ट्र मध्ये संख्येने छोटा जरी असला तरी विचार खूप खुप मोठे आहेत तेच विचार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला नक्कीच यश मिळवुन देतील.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डॉ बाबासाहेब देशमुख साहेब यांना आमदार करायचे आहे ही सर्व सामान्य लोकांची इच्छा आपण पुर्ण करुया ..अस आव्हान युवक श्री उमेश दादा लवटे शेतकरी कामगार पक्ष-पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष वाकी -शिवणे* यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments