google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नूतन शिवसेना पदाधिकाऱ्यांचा महुद येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न.

Breaking News

नूतन शिवसेना पदाधिकाऱ्यांचा महुद येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न.

 नूतन शिवसेना पदाधिकाऱ्यांचा महुद येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न.


 दसरा मेळाव्यासाठी मुबंई येथे येण्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे आवाहन.

 सांगोला/ प्रतिनिधी. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी सोलापूर येथे  शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगोला तालुक्यातील नुतून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या त्या मध्ये सागर सुभाष पाटील यांना संपर्क प्रमुख युवा सेना सोलापूर जिल्हा पदी, दादासाहेब लवटे यांना शिवसेना तालुकाप्रमुख सांगोला तालुकापदी श्री दीपक उर्फ गुंडा खटकाळे  यांना सांगोलतालुका युवासेना तालुकाप्रमुखपदी तसेच दत्तात्रय सावंत यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी  अश्या निवडी करण्यात आल्या आहेत

 या नूतन पदाधिकाऱ्यांचा  महुद ग्रामस्थांच्या वतीने दि २३ सप्टेंबर      

शुक्रवार रोजी महूद येथील मुख्य चौकामध्ये सत्कार संपन्न करण्यात आला या नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून शुभेच्छा देताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मनोगतात  सांगितले की यापुढे नवीन पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा गावोगावी शिवसेनेच्या शाखा स्थापन कराव्यात अशाही सूचना देण्यात आल्या  तसेच येणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनिकांनी मुंबई येथे उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 यावेळी  युवा नेते संजय मेटकरी,संजय देशमुख,अरुण नागणे, महेंद्र बाजारे, दिलीप नागणे, बाबुराव नागणे, यशवंत खबाले, सुरेश कदम, प्रमोद हुबाले, सोमनाथ मरगर, मिलन मरगर, राजू मरगर, उमेश चव्हाण, सचिन जाधव,यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments