google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री . छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानकडून विविध स्पर्धांचे आयोजन

Breaking News

श्री . छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानकडून विविध स्पर्धांचे आयोजन

 श्री  छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानकडून विविध स्पर्धांचे आयोजन 

सांगोला :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांगोला तालुक्यातील शिरभावी,  ( घोरपडे वस्ती ) येथील श्री . छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलाणीवस्ती शिरभावी या प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा , रंगभरण स्पर्धा , हस्ताक्षर स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे . लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा , मुलांच्या कौशल्य वाढीच्या दृष्टीने या विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे .   

तसेच या स्पर्धा दोन गटात होणार आहेत . यामध्ये लहान गट व मोठा गट असे दोन गट करण्यात येणार आहेत . या स्पर्धांमध्ये प्रथम , व्दितीय , तृतीय व उत्तेजनार्थ असे क्रमांक काढण्यात येणार आहेत . 

प्रथम , व्दितीय , तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे तसेच स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे . अशी माहिती श्री . छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक नागन्नाथ घोरपडे यांनी दिली आहे . यावेळी जि . प . प्रा . शाळेचे मुख्याध्यापक श्री . विजय शेंडे सर , श्री . मल्लिनाथ ढोपरे सर ,  प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments