सांगोला उदनवाडी येथे मोटर सायकल ,दागिनेसह …लाखो रुपयांची चोरी…
सांगोला तालुक्यातील मु.पो.उदनवाडी येथे दिनांक २०सप्टेंबर रोजी लाखो रुपयांची काल रात्री चोरी झालेली आहे याबाबत हा प्रकार सकाळी लक्षात आला आहे.
उदनवाडी येथील शिंगाडे मळा येथे श्री आप्पासो रामू आलदर यांच्या घरी ही चोरी झालेली आहे.घर मालक हे आपल्या कामानिमित्त मुंबई येथे असतात तेथे घरी त्यांच्या पत्नी सौ.कमल रामू आलदर ह्या एकट्या रहात आहे.त्या घरी दिवसभर असतात नंतर त्या झोपण्यासाठी भाच्याकडे -शेजारी जातात. आज सकाळी 7 वाजता त्या नेहमीप्रमाणे घरी आल्या असता त्याना घराचे दोन्ही कुलूप तोडल्याचे लक्षात आले.त्यामुळे त्यांनी घाबरून लगेच आतमध्ये जाऊन पाहिले असता दोन्ही कपाट अस्तव्यसत अवस्थेत असलेली दिसली.
याविषयी लगेच फोन करून भाच्याला ,शेजाऱ्याला बोलावून खात्री केली असता कपाटातून लॉकर मधील सोने,पैसे,कपडे, आणि साहित्य ,घरातील Hiro Hondaमोटर सायकल इत्यादींची चोरी झाल्याचं समजून आले.
यामध्ये जवळपास रोख रक्कम 25 हजार, 10 -12तोळे सोन साहित्य,मोटरसायकल चावी सह ..लाखो रुपये किंमतीची चोरी झालेली आहे .याबाबत सविस्तर घर मालक यांना सम्पर्क केला असून पोलीस यंत्रणा अन रीतसर पुढील प्रक्रिया चालू आहे अशी माहिती मिळत आहे.


0 Comments