google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाईन विक्रीबाबत राज्य सरकारचे मोठे संकेत, उत्पादनशुल्क मंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य…

Breaking News

वाईन विक्रीबाबत राज्य सरकारचे मोठे संकेत, उत्पादनशुल्क मंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य…

 वाईन विक्रीबाबत राज्य सरकारचे मोठे संकेत, उत्पादनशुल्क मंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य…

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आधीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. ठाकरे सरकारने ‘सुपर मार्केट’मध्ये वाइन विक्रीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विरोध पक्ष असणाऱ्या भाजपने या निर्णयास जोरदार विरोध केला होता.

भाजपकडून या निर्णयाच्या विरोधात राज्यभर आक्रमक आंदोलनेही केली होती. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार वाईनविक्रीचाही निर्णय रद्द करणार का, असा प्रश्न उपस्थित होत असताना, याबाबत राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत..

मॉलमध्ये वाईन विक्रीचे संकेत

ते म्हणाले, की “मॉलमध्ये वाईन विक्रीचा मसुदा जनतेसाठी खुला केला होता. आम्ही यासंदर्भात लोकांची मते जाणून घेतली. जुलै महिन्यात याबाबत अनेकांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार या निर्णयाच्या समर्थनात आणि विरोधात किती जणं आहेत, याचा अभ्यास करीत आहोत. उत्पादनशुल्क विभागाचे सचिव आणि आयुक्त यावर काम करत आहेत.”

येत्या 15 दिवसांत यासंदर्भातला अहवाल माझ्याकडे येईल. त्यानंतर मी स्वत: या प्रश्नाचा अभ्यास करून लोकांची मते जाणून घेणार आहे. त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. मॉलमधली वाईनविक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची असून, याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली.

भाजपही पाठिंबा देईल..!!

भाजपच्या विरोधाबाबत बोलताना देसाई म्हणाले, की “मला हव्या असणाऱ्या फॉरमॅटमध्ये माहिती संकलीत करण्याचे काम सुरू आहे. ही माहिती संकलीत करण्याचे काम झाल्यानंतर, तसेच माझ्या त्यावरचा अभ्यास झाल्यानंतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात सविस्तर माहिती देईन. या निर्णयाला भाजपही पाठिंबा देईल..”


Post a Comment

0 Comments