श्री. छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानकडून जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानपत्राचे वाटप
सांगोला : दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
‘गुरु’ यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे थोर विचारवंत, विद्वान तसेच महान शिक्षक होते. त्यांनी शिक्षणक्षेत्रासाठी आपले विशेष योगदान दिले. ५ सप्टेंबर हा दिवस सर्व शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे.
शिक्षक हे विद्यार्थ्यावर तसेच समाजावर चांगले संस्कार करतात. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा खरा मित्र व मार्गदर्शक आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भावी शिल्पकार असतो. एखादा मूर्तिकार ज्याप्रमाणे दगडावर संस्कार करून त्यापासून सुबक आणि सुंदर मूर्ती बनवतो त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवतात.
शिक्षकदिनाचे औचित्य साधून शिरभावी ( घोरपडे वस्ती ) ता.सांगोला येथील श्री. छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानकडून जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानपत्राचे वाटप करण्यात आले .
विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने महाराष्ट्रातील आदर्श शिक्षक बंधु-भगिनींना “ई सन्मानपत्र”पाठवुन सन्मानित केले. तसेच श्री. छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठान शिरभावी ( घोरपडे वस्ती ) येथील कार्यालयात सांगोला तालुक्यातील काही शिक्षकांना ऑफलाईन पद्धतीने श्री. छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नागन्नाथ घोरपडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .
यावेळी प्राध्यापक धनंजय घोरपडे , प्राध्यापिका रेश्मा दिघे , प्राध्यापिका स्वाती पाटोळे , प्राध्यापिका पूजा गाडे , प्राध्यापिका विद्या चव्हाण , प्राध्यापिका विद्या घोरपडे या सर्व प्राध्यापकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला . श्री. छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठान व जनजागृती सेवा समितीच्या सर्व पदाधिका-यांनी शिक्षक बंधु-भगिनींचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .
तसेच जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व श्री. छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नागन्नाथ घोरपडे या दोघांकडून ही विशेष शुभेच्छा देण्यात आल्या . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नागन्नाथ घोरपडे व जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांचे मोलाचे योगदान लाभले .


0 Comments