google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय जाहीर…

Breaking News

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय जाहीर…

 शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय जाहीर…

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सध्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे..

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमाशी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, राज्यातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचा समावेश असलेल्या वह्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे..

वह्यांमध्येच पुस्तके देण्याचा विचार

मंत्री केसरकर म्हणाले, की “विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या या एका वहीतच पाठ्यक्रमही असेल. सध्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके व तितक्याच प्रमाणात वह्यांचे ओझे पाठीवर वागवावे लागते. या ओझ्यामुळे अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनावरही भार पडत आहे. त्यामुळे सरकारने वेगवेगळ्या विषयांच्या स्वतंत्र पुस्तकांऐवजी आता वह्यांमध्येच पुस्तके देण्याचा विचार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येताना केवळ एक वही आणावी लागेल.”

विद्यार्थी विविध क्लासेस व गृहपाठाने त्रस्त झाले आहेत. शाळांच्या वेळा व गृहपाठाला सकाळीच उठावे लागत असल्याने मुलांचे बालपण दबले गेले आहे. त्यांना स्वच्छंदी व स्वतंत्र वातावरणात वाढू दिले जात नाही. त्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास योग्यरित्या होत नसल्याचे शास्त्रीयद़ृष्ट्या सिद्ध झाले आहे. मुलांचे बालपण जपण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांचा सल्ला घेणार आहोत.

शाळांच्या वेळा या मुलांच्या झोपेशी सुसंगत असल्या पाहिजेत. सकाळी सहा वाजता उठून मूल शाळेत जात असेल, तर अभ्यासात लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे मुलांच्या शाळेच्या वेळा सुसंगत ठेवून अभिनय, हस्तकला, चित्रकला, तसेच मैदानी खेळांमध्ये कौशल्य दाखवावे, यासाठी मुलांचा गृहपाठ कमी करण्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचेही केसरकर म्हणाले.

प्रवासखर्चासाठी 6000 रुपये

दरम्यान, मान्यता रद्द झाल्याने बंद झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. त्यात ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नसलीत, अशा विद्यार्थ्यांना शाळेत ये-जाता करण्यासाठी प्रवासखर्च म्हणून दरमहा 600 रुपये, असे 10 महिन्यांचे 6000 रुपये एकरकमी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांचे आधार सोबत लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती अपडेट करण्यात येणार आहे. ही माहिती डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असून, जानेवारी-2023 मध्ये विद्यार्थ्यांना निधीचे वाटप करण्याचे आदेश शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments