सोलापूर शहरातील 65 रेशन दुकानदारांना नोटीसा ; येत्या आठ दिवसात खुलासा करा, अन्यथा पुढील कारवाई
सोलापूर ः शहरातील अनेक रेशन दुकानामध्ये दरमहा रितसर धान्य वाटप केले जात नाही.तसेच लाभार्थ्यांना पावत्या दिल्या जात नाहीत अशा अनेक तक्रारी जिल्हाधिकारी आणि अन्नधान्या वितरण अधिकारी यांच्याकडे दाखल झाल्या होत्या.त्यांची तातडीने चौकशी करण्याचे आदेश अन्नधान्य पुरवठा अधिकारी सुमित शिंदे यांनी दिले होते.
त्यानुसार शहरात काही पथके नेमून ही चौकशी करण्यात आली हेाती त्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून शहरातील काही रेशन दुकानामध्ये त्रुटी आणि अनियमितता आढळून आली आहे त्या 65 रेशन दुकांनाना नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.
सोलापूर शहरातील अनेक लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळत नाही यासाठी शहरातील लोकप्रतिनिधीसह सर्वसामान्य नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांनी शहरातील जवळपास 350 रेशन दुकानाची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली हेाती. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ही चौकशी सुरु होती. यापैकी काही मंडळातील दुकानांचा अहवाल प्राप्त झाला आहे.तर काही दुकानांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
आलेल्या अहवालामध्ये काही दुकानात अनियमितता आणि वाटपात त्रुटी आढळून आल्या आहेत.त्यासाठी संबधित रेशन दुकानदारांनी येत्या आठ दिवसात याचा खुलासा करावा अन्यथा त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल अशा इशारा दिला आहे.त्यामुळे यावर आता रेशन दुकानदार काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


0 Comments