google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भाजपचे ‘मिशन 45’; राज्यभरात राबवणार ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान

Breaking News

भाजपचे ‘मिशन 45’; राज्यभरात राबवणार ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान

 भाजपचे ‘मिशन 45’; राज्यभरात राबवणार ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीदरम्यान ‘मिशन 45’ च्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यभर ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान राबवणार आहे. भाजप 2 ऑक्टोबरपासून या प्रचाराला सुरुवात करणार आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून भाजप केंद्र सरकारमधील योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहे. एवढेच नाही तर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धन्यवाद मोदीजी’ असे पत्र पाठवले जाणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रदेश भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण 10 लाख पत्रे पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन 45’ चे लक्ष्य ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. मात्र सध्या राष्ट्रवादीचा तोच बालेकिल्ला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसोबतच भाजप विधानसभेचीही तयारी करत आहे. त्याअंतर्गत भाजप पक्षातील मातब्बरांकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ जिंकण्याच्या सूचना मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच भाजपच्या मंत्र्यांचे राज्य दौरे पाहायला मिळणार आहेत.

Post a Comment

0 Comments