सांगोल्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्र विरोधी वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच महाराष्ट्र आणि मुंबई बाबत आक्षेपार्ह विधान करून राज्यात राजकीय खळबळ उडवली आहे. संपूर्ण राज्यभर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त होत असताना सांगोला येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. सोमवार दि १ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कोशारी यांचा निषेध नोंदविला.
यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तानाजी पाटील, शिवाजी बनकर, बापूसाहेब भाकरे, चंदन होनराव, अनिल खडतरे, शिवाजी कोळेकर, भिकाजी बाबर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिल खटकाळे, शहराध्यक्ष रवी चौगुले, संभाजी हरिहर, माजी सभापती अनिल मोटे, गिरीश पाटील, माजी सरपंच शहाजी हातेकर, संतोष पाटील, तुकाराम आळसुंदकर, माजी नगरसेवक आलमगीर मुल्ला, सरपंच चंद्रकांत करांडे, संतोष खडतरे, असलम पटेल, देवा लोखंडे, मोहसीन तांबोळी, निलेश खडतरे, दिलीप नागणे, दादा घाडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल सुरवसे, सरपंच किरण पवार, लहू पवार, उमेश गायकवाड, वसंत करांडे, अभिजीत कांबळे, ओंकार देशपांडे, सचिन भुसे आदींसह सामाजिक कार्यकर्ते अरविंद केदार, बापू ठोकळे, राजू मगर, प्रताप इंगोले आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष संभाजी हरिहर म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे सबंध देशाला महाराष्ट्राने सांस्कृतिक ऐतिहासिक आणि राजकीय आदर्श घालून दिला आहे असे असताना जाणीवपूर्वक महाराष्ट्राला आणि मुंबईला बदनाम करण्यासाठी राज्यपाल महोदयांनी वादग्रस्त विधान केले आहे हा सबंध महाराष्ट्र वासियांसाठी आणि मराठी लोकांचा अपमान आहे. मराठी माणूस हा अपमान कधीच सहन करणार नाही. राज्यपालांनी त्वरित मराठी लोकांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा भविष्यात हा लढा आणखी तीव्र होईल असा इशाराही यावेळी हरिहर यांनी दिला.
चौकट ;
भगतसिंह कोश्यारी चले जाव...!
वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांना आणि महाराष्ट्राला जाणीवपूर्वक बदनाम करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना राज्याचा राज्यपाल म्हणून राहण्याचा अधिकार नाही. अशा बेताल वक्तव्य करून मराठी माणसांना अपमानित करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात "भगतसिंह कोशारी चले जाव..." अशा यावेळी घोषणा देण्यात आल्या.
0 Comments