“ आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला " : महाविकास आघाडीच्या फुटीचे संकेत !
विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरुन आता महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याचे दिसत आहे . महाविकास आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही तर तो केवळ विपरीत परिस्थितीमध्ये घेतलेला निर्णय असल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे . काँग्रेस पटोले म्हणाले , विधानसभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता झाला , विधान परिषद नेता आम्हाला हवा होता बसून निर्णय घेता आला असता , मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला .
हे आम्हाला साधं विचारायला तयार नाहीत . आमच्याशी बोलायला तयार नाहीत . आमची आघाडी विपरीत परिस्थीती मध्ये झाली होती आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे . असे म्हणत पटोले यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली .दरम्यान , असे म्हणत नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला


0 Comments