google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयामध्ये "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त" विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Breaking News

विज्ञान महाविद्यालयामध्ये "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त" विविध कार्यक्रमाचे आयोजन.

 विज्ञान महाविद्यालयामध्ये "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त" विविध कार्यक्रमाचे आयोजन.

             विज्ञान महाविद्यालय सांगोला, येथे 15 ऑगस्ट रोजी असणाऱ्या "अमृतमहोत्सवी दिनानिमित्त" महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे प्रा. डॉ .बबन गायकवाड हे होते. प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, 15 ऑगस्ट हा दिवस आपण 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करत आहोत. परंतु हे स्वातंत्र्य आपणाला सहजासहजी मिळालेले स्वातंत्र्य नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांना आपले बलिदान द्यावे लागले आहे. 


अनेक लोक शहीद झाले आहेत. तेव्हा त्यांचे स्मरण त्यांची आठवण व्हावी आणि प्रत्येकाच्या मनामध्ये या देशाविषयी' राष्ट्राविषयी प्रेम निर्माण व्हावे म्हणूनच आपण या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये "हर घर तिरंगा अभियान"  प्रत्येकाच्या घरामध्ये तिरंगा ध्वज फडकवत आहे. देशाविषयी अभिमान प्रेम, सद्भावना,  जागृत करण्याचे कार्य करीत आहोत या कार्याला देशातील प्रत्येक नागरिक आज सहकार्य करत आहे. प्रेरणा देत आहे. ही खूप मोठी सकारात्मक बाब आहे. यातूनच आपल्या देशाची लोकशाही डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना जागृत असल्याचे स्पष्ट होते. असे विधान प्रा. डॉ. बबन गायकवाड यांनी केले. 


पुढे ते स्पष्ट करतात की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोकांनी आपले बलिदान दिले त्यामध्ये कडलास या गावातील पाच लोकांचे बलिदान ही बाब खूप महत्त्वाची आहे. आज त्यांचे स्मरण या निमित्ताने होत आहे .देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेक हुतात्मे घराघरांमध्ये निर्माण झाले. त्याग, बलिदान याच्या जोरावरती आपणाला स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य मिळाले खरे पण या स्वातंत्र्याचा अर्थ आपण लावणार कसा आहोत हे खूप महत्त्वाचे आहे हे स्वातंत्र्य देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी ,समाज हितासाठी असायला हवे आणि विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आपला मोलाचा वाटा उचलला पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला


             महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथराव फुले अध्यक्ष मनोगता मध्ये म्हणतात की, विद्यार्थ्यांनी राष्ट्रहितासाठी, देशहितासाठी, स्वतःला झोकून दिले पाहिजे. जे जवान आज सीमेवरती रात्र आणि दिवस या देशाची सेवा करीत आहेत आपल्या प्राणांची आहुती देत आहे ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता राष्ट्र प्रेमाने ते झपाटलेले दिसत आहेत. 


आज सीमेवरती देशाचे संरक्षण करत आहे आणि आजचे तरुण आपल्या देशातील साधन संपत्तीचे नुकसान करत आहेत अशी खंत अध्यक्षांनी व्यक्त केली. तेव्हा सीमेवरती असणाऱ्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी प्रत्येक तरुणाने आपल्या मनामध्ये या देशाविषयी प्रेम बाळगलेच पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. सीमेवरती जे जे जवान आहेत त्यांचा आदर्श घेऊन आपल्या देशाची सेवा केली पाहिजे. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा दिवस आहे हा दिवस विद्यार्थ्यांनी सुट्टीचा दिवस न मानता तो देशहितासाठी समाज हितासाठी लावला पाहिजे विद्यार्थी जागृत झाला पाहिजे देशाविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम भावना निर्माण झाली पाहिजे त्याग आणि बलिदान याची ऊर्जा निर्माण झाली पाहिजे अशी प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केली


        स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दीपक रिटे यांनी केले तर आभार प्रा अशोक वाकडे यांनी मांडले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments