सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना सुचवले ‘हे’ दुसरे चिन्ह!
मुंबई: 'धनुष्यबाण हा शिंदे गटाला मिळणार आहे, आम्ही आमच्या फॉर्मवर धनुष्यबाण लिहून ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे बघितले पाहिजे, उद्धव ठाकरे यांनी जास्त वाईट वाटून न घेता ढाल तलवार हे चिन्ह घ्यावे, दोन्ही शस्त्रेच घ्यावीत. ढाल तलवार चिन्ह घेऊन या निवडणुकीला, कशाला भांडत बसता', असे वक्तव्य आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. यानंतर एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा गट तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता दोन्हीकडून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे.
परंतु, आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह नेमके कोणाला मिळणार याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दुसरे चिन्ह सुचवले राजकीय वर्तुळात वाद वाढण्याची शक्यात आहे.
0 Comments