ब्रेकींग : राज्याचे पालकमंत्री नियुक्त ; सोलापूरला कोण, यांच्या हस्ते होणार सोलापुरात ध्वजारोहण
सोलापूर : मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर तब्बल 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित केला गेला. मंत्री तानाजी सावंत हेच पालकमंत्री होणार अशा चर्चा सुरू झाल्या. मग स्वातंत्र्य दिनी आता शासकीय झेंडावंदन कोण करणार याची ही चर्चा होती.
दरम्यान मंत्रालयातून राज्यातील जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये केवळ 19 जिल्ह्यांना पालकमंत्री पदे मिळाली आहेत. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री झाले असून सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात येणार आहे ते पत्र पहा.....


0 Comments