सांगोला येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत जनतेत संभ्रमावस्था
सांगोला नगरपरिषद निवडणूक आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांमध्ये उत्साह संचारला होता . अशा इच्छुक उमेदवारांची चाचपणी नेतेमंडळींकडून करण्यात येत असताना नुकतेच राज्य शासनाने प्रभाग बदल करण्याचे जाहीर केले आहे . त्यामुळे इच्छुक उमेदवार सर्वच पक्षांची नेतेमंडळी , मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे .
निवडणूक कधी होईल हे कोणीही ठोस सांगत नाही . यामुळे पदाधिकाण्यांविना प्रशासकच किती दिवस राहणार , हा संशोधनाचा विषय आहे . नगरपालिका हद्दीतील विकासकामांना ब्रेक लागला आहे . सर्वसामान्य नागरिकांनी आपली व्यथा कोणाकडे मांडायची व त्याचा कितपत उपयोग होईल , हे असेच किती दिवस चालणार , याबाबतची चर्चा नागरिकांमधून केली जात आहे . नगरपालिकेची मुदत संपून आठ महिने उलटून गेले .
या नगरपालिकेवर प्रशासक म्हणून तहसीलदार व अधिकारी म्हणून मुख्याधिकारी काम पाहत आहेत . सांगोला नगरपालिका निवडणुकीत यापूर्वी २० नगरसेवक व २ स्वीकृत नगरसेवक निवडून दिले जात होते . २०११ च्या जनगणनेनुसार सांगोला नगरपरिषदेची ३४ हजार ३२१ लोकसंख्या आहे . त्यानुसार १ नगरसेवक १ हजार ४ ९ २ लोकांचे प्रतिनिधित्व म्हणजे एका प्रभागातील २ सदस्य , २ हजार ९ ८४ लोकांचेप्रतिनिधित्व करणार आहेत .
उद्याच्या निवडणुकीत एकूण २३ सदस्य निवडून द्यायचे आहेत . १ ते १० प्रभागांत २ नगरसेवक असे २० नगरसेवक , तर ११ व्या प्रभागातून एकूण ३ सदस्य , असे एकूण २३ नगरसेवक निवडून येणार आहेत . त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून उमेदवार आणि मतदारांची जुळवाजुळव सुरू झाली असून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी भावी नगरसेवक कामाला लागल्याचे दिसून आले .
परंतु , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सर्वच स्वराज्य संस्थांची प्रभागरचना बदलून सदस्य संख्या कमी करण्याचे आदेश दिल्याचीही चर्चा शहरवासीयांतून होत आहे .निवडणूक लवकर व्हावी नगरपालिकेची निवडणूक कधी होईल हे कोणीही ठोस सांगत नाही . यामुळे निव संभ्रमावस्था निर्माण झाली आहे . नगरपालिकेची निवडणूक निवडणूक आयोगाने लवकर घ्यावी , अशी मागणी मतदारांमधून केली जात आहे .
यामुळे नगरपालिकेच्या निवडणुका कशा पद्धतीने होणार , प्रभाग रचना बदलली जाणार का सदस्य संख्या कमी होणार का , फेर आरक्षण होणार का , याबाबत जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे . नकी निवडणुका कधी होणार , अजून किती दिवस प्रशासकच नगरपालिकेचे कामकाज पाहणार , याबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे . यामुळे नगरपालिकेचा विकास खुंटला आहे . सर्वसामान्य जनतेची गान्हाणी ऐकणारे कोणीही नाही .
तसेच विविध विकासकामेही ठप्प झाली आहेत . पुढे कोणती कामे घ्यायची , हाही विषय पेंडिंग आहे .. यामुळे सध्या नगरपालिकांमध्ये आजी - माजी पदाधिकारी , विविध पक्षांचे नेते यांच्याकडे कोणतेही विकासकाम नगरपालिकेबाबत घेऊन नागरिक जात नाहीत . नगरपालिकेमार्फत विकासकामे व्हावीत हीच अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे .


0 Comments