मोठी ब्रेकिंग : जिल्हा परिषद आरक्षण व मतदार यादी प्रक्रियेला निवडणूक आयोगाची स्थगिती
सोलापूर : राज्यातील 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समिती साठी आरक्षणाची अंतिम अधिसूचना शुक्रवार पाच ऑगस्ट रोजी जारी करण्यात येणार होती मात्र राज्य निवडणूक आयोगाने तातडीने आदेश काढून शुक्रवार 5 ऑगस्ट रोजीची अंतिम आरक्षण अधिसूचना तसेच येत्या 8 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती या दोन्ही प्रक्रिया तातडीने थांबवल्या आहेत.
05 ऑगस्ट 2022 रोजी 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समित्यांमध्ये जागांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना जारी करण्यात येणार होती. त्याचप्रमाणे 08 ऑगस्ट 2022 रोजी 13 जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये बुथनिहाय अंतिम मतदार यादी जारी करण्यात येणार होती. तसेच प्रारुप मतदार यादी 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये 10 ऑगस्ट 2022 रोजी जारी करण्यात येणार होती.
दरम्यान महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 मध्ये सुधारणा करून त्याद्वारे जिल्हा परिषदांच्या एकूण जागांची संख्या बदलली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आतापर्यंत केलेल्या सीमांकन आणि आरक्षणाच्या सर्व प्रक्रिया रद्द केल्या आहेत आणि अशी प्रक्रिया नव्याने सुरू केली जाईल अशी तरतूद केली आहे.
आतापर्यंत केलेल्या सर्व प्रक्रिया थांबवण्याचे आणि आरक्षणासाठी किंवा मतदार याद्यांसाठी अंतिम अधिसूचना जारी होण्याची प्रतीक्षा करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील आदेशापर्यंत.




0 Comments