आनंदा माने यांचे वाढदिवसानिमित्त डॉ. स्वागत तोडकर यांचा तोडकर संजीवनी व रक्तदान शिबीराचा कार्यक्रम संपन्न
सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन याठिकाणी डॉ. स्वागत तोडकर यांचा घरगुती निसर्गोपचार पध्दतीने निरोगी आयुष्य कसे जगावे? या विषयावरती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच धनगरगल्ली येथील समाजमंदिरामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यानंतर पु. राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन याचठिकाणी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी उपस्थित राहून आनंदा(भाऊ) माने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
0 Comments