आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न
विजेत्यांसाठी मोठी बक्षीसे; कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद
सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांच्या बुधवार दि. 3 ऑगस्ट रोजीच्या वाढदिवसानिमित्त हर्षदा लॉन्स् मिरज रोड सांगोला याठिकाणी महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून विजेत्या महिलांसाठी भरघोस बक्षीसेही ठेवण्यात आली होती.
सदरचा कार्यक्रम हा विटा येथील नितीन गवळी भाऊजी यांनी केला असून वेळवेगळे खेळ घेऊन विजेत्या महिलांना यावेळी बक्षीसे वाटप करण्यात आली असून यामध्ये प्रथम क्रमांक सौ. विजयमाला शिवाजी बनकर यांचा आला असून त्यांना अर्धा तोळा सोने (कानातील वेल) व पैठणी हे बक्षीसदाते माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्याहस्ते देण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक सौ. रेश्मा प्रशांत दिवटे यांचा आला असून त्यांना सॅमसंग फ्रिज व पैठणी
हे बक्षीसदाते माजी उपनगराध्यक्षा सौ. कुशाला बिरूदेव माने यांच्याहस्ते, तृतीय क्रमांक सौ. रोहिणी विशाल लोखंडे यांचा आला असून त्यांना सोफा सेट व पैठणी हे बक्षीसदाते सौ. स्वाती विजय माने व सौ. पूजा ज्ञानेश्वर गाडेकर यांच्याहस्ते, चतुर्थ क्रमांक सौ. ज्योती राहूल वाघमोडे यांचा आला असून त्यांना सोलो ओव्हन व पैठणी हे बक्षीसदाते सौ. अश्विनी अरूण पाटील यांचेकडून, पाचवा क्रमांक सौ. प्रियांका स्वप्निल आवटे यांचा आला असून त्यांना व्हॅक्युम क्लिनर व पैठणी हे बक्षीसदाते सौ. स्वप्नाली सुहास सादिगले यांच्याहस्ते, सहावा क्रमांक सौ. साक्षी काशिलिंग गाडेकर यांचा आला असून त्यांना मिक्सर व पैठणी हे बक्षीसदाते सौ. जानकी दत्तात्रय घाडगे यांच्याहस्ते तर सातवा क्रमांक सौ. सुषमा सुधीर महाजन यांचा आला असून त्यांना छताचा पंखा व पैठणी हे बक्षीसदाते सौ. मनिषा बापूसाहेब गावडे यांच्याकडून देण्यात आले आहे.
तर उपस्थित महिलांपैकी एकूण 409 महिलांनी लकी ड्रॉमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यापैकी 50 नशीबवान महिलांना पैठणी साडी देण्यात आली आहे. यामध्ये ज्योती जानकर, प्रतिक्षा माने, अश्विनी गडदे, शोभा जवंजाळ, शुभांगी बाबर, ॠतुजा खुळपे, अपर्णा चांडोले, अरूणा बंडगर, संजीवनी भोसेकर, अश्विनी विश्वकर्मा, सुप्रिया पाटील, सुमन कबाडे, विजया बोत्रे, संगिता दिघे, सुचिता माने, विद्या भुसनर, मनिषा जगताप, मनिषा हुंडेकरी, प्रियांका आदाटे, अश्विनी चांडोले, अश्विनी पाटील, वैशाली पैलवान, दिपाली निंबाळकर, सुनिता ढोले, मधुमती बनसोडे, लक्ष्मी सादिगले, वैशाली बोत्रे, सारिका रसाळ, श्रीदेवी पैलवान, स्वप्नाली सादिगले, सरस्वती पाटील, साधना गडदे, मुस्कान मुलाणी, मनिषा तोडकर, उज्वला चोथे, सविता टेंगले, मंगल येलपले, अविंदा बनसोडे, मनिषा मदने, जिजाबाई बनकर, करूणा जांगळे, निवेदिता काटे, माया मेटकरी, विद्या माने, अनिता सोनार, सुनिता खुळपे आदी महिलांना पैठणी वाटप करण्यात आली.
त्याचबरोबर कोरोना काळामध्ये रूग्णांना योग्य प्रकारे सेवा दिल्याबद्दल स्त्रिरोग तज्ञ डॉ. पूजा साळे, नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉ. वंदना चाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा काटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विदुला बाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. निकहत ईबुशे, औषध निर्माण अधिकारी सौ. जास्मीन मुलाणी, औषध निर्माण अधिकारी सौ. नाजिया मुजावर, सफाईगार सुनिता खंदारे यांच्यासह प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री. निशिकांत पापरकर, आरोग्यसेवक श्री. अरूण कोळी या अधिकार्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, महिला सूतगिरणीच्या व्हा. चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, माजी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, माजी नगरसेविका सौ. स्वातीताई मगर, माजी नगरसेविका सौ. अनुराधाताई खडतरे, माजी नगरसेविका सौ. रंजनाताई बनसोडे, शीलाकाकी पाटील यांच्यासह राजमाता महिला पतसंस्थेच्या सर्व संचालिका व शहरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सदरचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सौ. ज्योती चोरमुले, राजमाता महिला पतसंस्थेच्या सचिव सौ. मनिषा हुंडेकरी, सुधामती माळी, सौ. निलिमा बनसोडे, सौ. पल्लवी कांबळे, आरती मोटे, भाग्यश्री हाके, महेक नदाफ, रेहसा नदाफ आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments