google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला- वाटंबरे आणि सांगोला-पंढरपूर रोडवरील "टोल"नाका बनलाय पोलीसांच्या वसूलीचा "अड्डा"

Breaking News

सांगोला- वाटंबरे आणि सांगोला-पंढरपूर रोडवरील "टोल"नाका बनलाय पोलीसांच्या वसूलीचा "अड्डा"

 सांगोला पोलीसांच्याकडून जनावरांची अवैध्य वाहतूक या
सांगोला- वाटंबरे आणि सांगोला-पंढरपूर रोडवरील "टोल"नाका बनलाय पोलीसांच्या वसूलीचा "अड्डा"

सांगोला प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरला जातो. याबाजाराचे प्रमुख आकर्षण म्हणजे खिल्लार जनावरं. या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक ,आंध्र प्रदेश, तेलंगण, आणि राजस्थान या भागातील शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर जनावरे खरेदी करण्यासाठी बाजारात येत असतात.


 सांगोला- मंगळवेढा रोडवर, सांगोला- मिरज, सांगोला- जवळा, आणि सांगोला- पंढरपूर रोडवर अशा महत्त्वाच्या रोडवरती पोलीस ठाण मांडून थांबलेले असतात. याठिकाणचा बाजार हा साधारण पणे शनिवारी दुपारच्या नंतर भरण्यास सुरुवात होते आणि रविवारी दिवसभर चालत असतो. 


शेतकरी आणि व्यापारी वर्ग हे मिळेल त्या वाहनाने आपली जनावरे खरेदी - विक्री साठी बाजारात येत असतात परंतु सांगोला शहरात येणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या रोडवरती हि जनावरे भरलेली वाहनं अडवून त्यांच्या कडून हजारो रूपये दर रविवारी हे पोलीस सातत्याने करत आहेत. ड्रायव्हर लायसन्स,गाडीचे पेपर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या तरी देखील वाहनधारकांना अवैध्य जनावरांची वाहतूक या गोंडस नावाखाली वाहणधारक आणि शेतकऱ्यांच्या खिशावर अक्षरशः डल्ला मारण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे.


 एखाद्या वाहनधारकांने पोलीसांना विचारण्याचा प्रयत्न केला तर पोलीसांच्या कडून दमदाटी केली जाते आणि गाडी वर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी दिली जात आहे त्यामुळे हे सर्व लोकं पैसे देऊन निघुन जातात. मात्र या सर्व घटनेकडे वरिष्ठ पोलिस अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत आहे.

Post a Comment

0 Comments