google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदा माने यांच्या वाढदिवसादिवशी जन्मलेल्या 7 मुलींच्या नावे प्रत्येकी 15 हजार रूपयांची ठेव

Breaking News

आनंदा माने यांच्या वाढदिवसादिवशी जन्मलेल्या 7 मुलींच्या नावे प्रत्येकी 15 हजार रूपयांची ठेव

 आनंदा माने यांच्या वाढदिवसादिवशी जन्मलेल्या

7 मुलींच्या नावे प्रत्येकी 15 हजार रूपयांची ठेव


सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 3 ऑगस्ट 2022 रोजी सांगोला तालुक्यात जन्मलेल्या मुलींच्या नांवे 15 हजार रूपयांची राजमाता महिला पतसंस्थेमध्ये मुदतठेव ठेवण्याचा संकल्प केला होता. 


त्यानुसार दि. 3 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या तालुक्यातील 7 मुलींच्या नांवे प्रत्येकी 15 हजार रूपयांची ठेव ठेवण्यात आली आहे. यामध्ये सोनाली अमोल खांडेकर- अजनाळे, सोनाली विजय मोरे- एखतपूर, मोहजबीन शौकत मुजावर- सांगोला, विद्या प्रदीप आदाटे- माळेवाडी, ताई कृष्णा हजारे- चिंचोली, प्रज्ञा विकास उबाळे- एखतपूर, सुनिता मारूती गोफणे अशी मुलींच्या आईंची नांवे आहेत. 


सदरची ठेव ठेवलेबाबतचे सर्टिफिकेट मुलींच्या नातेवाईकांना काल आनंदा माने यांच्या संपर्क कार्यालयामध्ये वाटप करण्यात आले. यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई आनंदा माने, माजी नगरसेविका सौ. स्वातीताई मगर, माजी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, राजमाता महिला पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन सौ. प्रियांका श्रीराम, लतिका मोटे, अश्विनी पाटील, सुधामती माळी, मनिषा हुंडेकरी, पल्लवी कांबळे, निलिमा बनसोडे आदी उपस्थित होते.


सदरची ठेव ही प्रत्येक 7 वर्षांनी दामदुप्पट करून मुलीच्या 21 व्या वर्षी ही रक्कम जवळपास 1 लाख 20 हजार रू. इतकी होणार आहे. ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नकार्यासाठी वापरण्यात यावी, मुलीच्या आई-वडीलांवर आर्थिक ताण पडू नये, या सामाजिक हेतूने आनंदा माने यांनी 2015 सालापासून हा सामाजिक संकल्प सुरू केला आहे.


आनंदा माने आगळ्यावेगळ्या संकल्पातून एक सामाजिक कार्य तर केले आहेच त्याचबरोबर समाजासमोर एक आदर्श सुध्दा घडविला आहे. या संकल्पाबद्दल जनमाणसातून आनंदा (भाऊ) माने यांचे कौतुक व आभार व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments