धान्यावरील हक्क सोडण्यासाठी श्रीमंतांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत अन्यथा होणार गुन्हे दाखल : रेशन दुकानदारांकडून माहिती देण्याचे काम सुरू
सोलापूर गरीब व सर्वसामान्य लोकांसाठी असलेल्या रास्त भाव धान्य दुकानात कार्ड धारक असलेल्या श्रीमंतांना त्यांच्या धान्यावरील हक्क सोडण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे . स्वत : हुन अर्ज करून धान्यावरील हक्क न सोडल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत .
रेशन दुकानदारांकडून श्रीमंतांची माहिती घेण्याचे काम सुरु झाले आहे . सरकारी नोकरदार , मोठ्या पगारावरील खासगी नोकरदार , बागायतदार शेतकरी मोठे व्यापारी व श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात रेशनकार्ड धारक आहेत . केशरी कार्ड असल्याने तेही प्रत्येक महिन्याला धान्याचा लाभ घेत आहेत . शहर वजिल्ह्यात ७८ टक्के लोकांना प्रत्येक महिन्याकाठी धान्याचे वाटप होत असते . गोरगरीब व वंचितांना पुरेसे धान्य मिळावे यासाठी शहर व जिल्ह्यातील धनदांडग्या लोकांनी आपला हक्क सोडावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे व शहर पुरवठा अधिकारी सुमित शिंदे यांनी केले आहे .
सध्या गरीब व वंचितांना रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत . हेच धान्य ज्यांना गरज नाही अशा श्रीमंत व चांगली परिस्थिती असलेल्या लोकांचे बंद झाले तर त्याचा लाभ गरजूंना होईल . हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्रीमंतांना धान्य न घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत . आम्हाला धान्य नको असा एक अर्ज संबंधित रेशन दुकानदारांकडे द्यावा लागणार आहे . पुरवठा अधिकारी व कर्मचारीवंचितांना धान्याची गरज : वर्षा लांडगे समाजामध्ये गरीब व वंचितांना पुरेसे धान्य मिळत नाही .
ज्यांची ऐपत आहे . त्यांनी आपला हक्क सोडल्यास गरिबांना त्याचा लाभ होईल . त्यामुळे गरज नसणाऱ्यांनी आपला हक्क सोडावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहे .दुकानांची संख्या व कार्डधारक शहरातील रेशन दुकान ३२४ अंत्योदय कार्ड ६१५४ अन्न सुरक्षा १२००१८ । ग्रामीण भागातील रेशन दुकान २५५६ अंत्योदय ५४३ ९ ८ अन्नसुरक्षा ३५२७२४ शहर व जिल्ह्यातील रेशन दुकानदारांकडून माहिती घेत आहेत .
१५ ऑगस्ट पर्यंत ही मुदत देण्यातपुरावभावने करण्यात आलेल्या अवहानानंतर शहर व जिल्ह्यातील रेशन दुकानदार श्रीमंत लोकांची यादी तयार करीत आहेत . दुकानदार लोकांना आन करून धन्यावरील हक्क सोडण्यासंदर्भात सोडतील त्यांचे अर्ज व सोडणार नाहीत त्यांची नावे विभागाला १५ ऑगस्टर सादर केली जातील . - नितीन पेंटर , सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकान सोसिएशन घेत आहेत . जे आली असून त्यानंतर मात्र फौजदारी स्वरूपाची कारवाईला सुरुवात होणार आहे .


0 Comments