रेल्वे रुळावर डोके ठेऊन 24 वर्षीय युवकाने केली आत्महत्या ; मानेवरून रेल्वे गेल्याने डोके धडापासून वेगळे !
परभणी : परभणी जिल्ह्यात मानवतच्या कोल्हावाडी शिवारात रेल्वे रुळावर एका 24 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . दीपक वाटुरे असे आत्महत्या केलेल्या मयत युवकाचे नाव आहे . याबद्दल अधिक माहिती अशी कि , दीपक रावसाहेब वाटूरे ( वय 24 ) ही मृत युवक सेलु तालुक्यातील वालुर येथील राहणारा होता .
मानवतरोड ते देवलगाव अवचार दरम्यान कोल्हावाडी शिवारात पॅसेंजर आली असताना दीपक हा रेल्वे रुळावर झोपल्याने या युवकांच्या मानेवरून रेल्वे गेल्याने त्याचे डोके धडापासून वेगळे झाले आहे . दरम्यान , या घटनेनंतर मृत युवकाच्यामृतदेहाचे कोल्हा येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले . तसेच आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढीत तपास सुरू केला आहे .


0 Comments