आटपाडी : राजेवाडी येथे गळफास घेत पती - पत्नी आत्महत्या
राजेवाडी येथे पती - पत्नीने आटपाडी : आटपाडी तालुक्यातील गळफास घेत दुर्देवी घटना आत्यहत्या केल्याची घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे . याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , राजेवाडी येथील करण हेगडे व पत्नी शीतल हेगडे यांच्या लहान मुलीचा तीन - चार दिवसापूर्वी मृत्यू झाला होता . तर त्यांच्या भावकीतील एकाचा तक्रारीवरून त्यांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता .
गुरुवादी ( दि . ३० ) रोजी त्यांनी राजेवाडी येथील कानिफनाथ काळामळा मंदिरालगत असणाऱ्या झाडाला एकाच दोरीने करण हेगडे व शीतल हेगडे यांनी गळफास घेत आत्महत्या केली . लहान मुलीचा मृत्यू व पोलीस स्टेशनच्यातक्रारी यामुळे हेगडे पती - पत्नीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे . सदर घटनेने हेगडे कुटुंबीय त्सेस राजेवाडी गावावर शोककळा पसरली असून आटपाडी आटपाडी ग्रामीण रूग्णालयामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले .


0 Comments