एकतपुर जिल्हा परिषद गटांमध्ये परिवर्तन अटळ..अक्षय विभुते 'मनसे'
एकतपुर जिल्हा परिषद गटांमध्ये परिवर्तन अटळ..अक्षय विभुते यांच्या 'मनसे' कामामुळे... दिग्गजांना बसणार पराभवाचा धसका!
कोरोना काळात घरा-घरात जावून केलेलेल्या कामाची पुण्याई येणार कामाला
राजकारणात कोणीच अमृत पिऊन आलेला नसतो... लोक बड्या-बड्यांचे तख्त उलधून टाकत... जो काम करील, जनतेच्या सुखा -दु:खात पहाडासारखा पाठीशी उभा राहील... त्याला साथ देत असतात... सांगोला तालुक्यातील एकतपुर जिल्हा परिषद गटांमध्ये यावेळी अशीच परिस्थिती असून मनसेचे विधानसभा अध्यक्ष अक्षय विभुते यांनी कोरोना महामारीच्या काळात 'जीथे कमी तिथे मी'म्हणत लोकांना मदत केली... पहिल्या लाटेत 2 हजार कुटुंबांना 'असैनिक अल्बम'. हे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे होमीओपॅथीचे औषध मोफत वाटले...
गोरगरिबांना किराणामाला सह भाजीपाला देखील घरपोच वाटप केला... कोरोना रुग्णांना बेड मिळत नसतानाच्या काळात मेडशिंगी कोरोना सेंटर मध्ये बेड उपलब्ध करून दिले... राज साहेब ठाकरे व दिलीप बापू धोत्रे यांचा विश्वासू असलेला अक्षय विभुते यांनी केलेल्या 'मनसे'कामामुळे सध्या अक्षय विभुते यांच्याच नावाची चर्चा आहे... त्यामुळे एकतपुर जिल्हा परिषद गटांमध्ये यावेळी परिवर्तन अटळ असून दिग्गजांना पराभवाचा धस्सका बसणार आहे.
" *जो आवाज देईल त्याच्या,, हाकेला ओ देणारा मनसैनिक*
एकतपुर जिल्हा परिषद गटामधील जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कोरोना काळात गायब असताना विधानसभा अध्यक्ष अक्षय विभूते हे "जो आवाज देईल,, त्याच्या हाकेला ओ देत होते.. पूर्ण काळात रक्ताच्या नात्यातील माणसे बाधीत रुग्णांच्या जवळ येत नसताना अक्षय विभुते यांनी मेडशिंगी कोरोना सेंटर मध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली एवढेच नव्हे तर रस्ते विज पाणी असे कोणतेही प्रश्न असो, अक्षय विभुते एका हाकेवर धावून जात प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात
0 Comments