अवैद्य वाळू धंद्यांसह वाळू चोरांची पाठराखण करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई करणार.. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते
सांगोला/ शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज :ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करून अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावा. पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी एक हजार घरांचे प्रस्ताव सोलापूर जिल्ह्यातून पाठवले असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
सांगोला पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणच्या निमित्ताने व पोलीस पाटलांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, सर्वच अवैद्य धंद्यांवरती कारवाया करण्यात आल्या आहेत. परंतु या कारवाया पुरेशा नाहीत. त्या कारवाया वाढल्या पाहिजेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सन 2020 पेक्षा 2021 मध्ये जुगार, दारू, हातभट्टी यावर अधिक कारवाया झाल्या आहेत. तर सन 2022 मध्ये त्यापेक्षा अधिक आहेत. अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो.
अवैद्य वाळू धंद्यांसह वाळू चोरांची पाठराखण करणार्या पोलिसांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. नगरपरिषदेचा भाग वगळता प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असून या माध्यमातून दरोडे, घरफोड्या, अपहरण, अवैद्य दारू व्यवसाय, वाळू चोरी थांबवले आहेत. या ग्राम सुरक्षा यंत्रणेचा यापुढेही अधिक प्रभावी वापर करून जिल्ह्यातील अवैध व्यवसय व विशेषतः वाळू चोरी कमी करता येऊ शकेल.
दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर तडीपारचीही कारवाई करण्यात येत आहे. अवैद्य धंद्याबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेची संवाद साधला निश्चितपणे या धंद्यांना आळा बसू शकेल. ऑपरेशन परिवर्तन हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात माझ्या संपूर्ण टीमचे यश आहे. सांगोला पोलिसांच्या निवासाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून एक हजार पोलिसांच्या घराचे प्रस्ताव पाठवले आहेत असेही त्यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यामध्ये माण कोरडा अप्रुगा बेलवण नदी पात्रातून दररोज दिवस रात्र हजारो ब्रास वाळू उपसा केला जात असून या वाळू चोरीकडे अधिकाऱ्यानेच पाठ फिरवल्याचे नागरिकातून बोलले जात आहे
सांगोला तालुक्यामधील वाळू माफियाचे आणि अधिकाऱ्याचे आर्थिक हितसंबंध असल्याने बऱ्याच वेळा वाळू चोरी करणाऱ्या गाडया पकडून देखील त्या गाड्या सिस्टीम मधील असल्याने सोडून दिल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे वाळू चोरी होत असलेली गाडी सरपंचानी व पोलीस पाटलानी पकडून देखील ती गाडी सिस्टिम मधील असल्याने तीन दिवस होऊन गेले तरी त्या गाडीकडे महसूल विभागाचा अधिकारी फिरकला देखील नाही त्यामुळे दररोज हजारो ब्रास वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफिया बरोबरच शेतातून वाट देऊन वाळू चोरांना सहकार्य करणाऱ्या शेतकर्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होऊ लागलेली आहे.
0 Comments