लाडक्या लोकनायकास अधिक गती देण्याकरिता कार्यकर्त्यांकडुन दिपक आबांना _"लोकरथ"_ अर्पन.....
सांगोला तालुक्याचे सर्वात लाडके व सर्वात लोकप्रिय नेते म्हणुन राष्र्टवादि कांग्रेस पार्टिचे प्रदेश उपाध्यक्ष मा. दिपक आबा साळुंखे पाटिल यांना ओळखले जाते.सतत कार्यकर्त्यांचे गारुड असणारे व कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिपक आबा वावरताना दिसतात...आबांवरती प्रेम असणार्या कार्यकर्त्याचे कोणतेही काम असो अथवा नसो पण आबा सांगोल्यात आले की,हे कार्यकर्ते आबांकडे आवर्जुन जातात..व आबाही तितक्याच मनमोकळेपणाने कार्यकर्त्यांशी निखळ संवाद साधतात...
सध्याच्या स्वार्थी व मतलबी राजकीय विश्वात अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यास कधी सोडुन जातील याचा काही भरवसा नाही..अर्थात यामध्ये कार्यकर्त्यांचा काही दोष आहे असेही नाही...कारण नेत्यांनीच निष्ठा खुंटीला टांगलेली आहे.त्यामुळे केवळ स्वताच्या स्वार्थापोटि नेते केवळ निवडणुकीपुरता कार्यकर्त्यांचा वापर करतात...आणि निवडणुक संपली की,आपल्या सोईप्रमाणे कार्यकर्त्याना वार्यावर सोडुन देतात...त्यामुळे असे कार्यकर्ते खचतात....हताश होतात आणि वेगळा पर्याय निवडतात...
त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही नेत्याकडे कार्यकर्ता हा फार काळ टिकुन राहत नाही...पण याला अपवाद मात्र "दिपक आबा "राहीले आहेत...आबांच्या सुस्वभावामुळे त्यांच्याकडे आलेला कोणताही कार्यकर्ता दुरावत नाही.आपल्या संमोहीत व्यक्तीमत्वामुळे दिपक आबांनी तालुक्यात व तालुक्याबाहेर हजारो कार्यकर्ते तयार केले आलेत...केवळ कार्यकर्ते तयार केलेत असे नाहीत तर त्यांना उभे राहण्यास बळ ही दिले आहे..आबांच्या अंगी असणार्या चुंबकीय गुणधर्मामुळे त्यांच्याकडे हजारो कार्यकर्ते आपसुक आकर्षित होतात...व आबांवर जिवापाड प्रेम करतात...अशी कार्यकर्त्याची *निस्सीम श्रध्दा व भक्ती काही मोजक्याच नेत्यांच्या नशीबात असते..
त्यामध्ये जननायक लोकनेते दिपक आबा हे एक आहेत...आपला कार्यकर्ता कीतीही मोठ्या अडचणीत व संकटात सापडला तर दिपक आबा मोठ्या शिताफीने त्यास त्या संकटातुन बाहेर काढतात..हा आबांचे एक गुणवैशिष्ठ आहे..आबांनी कोणत्याही पदाची कधीही अपेक्षा व महत्वकांक्षा न बाळगता केवळ आणि केवळ माणसं जोडण्याचे काम केले..अर्थात कार्यकर्त्यांचा गोतावळा हेच मुळात आबांचे शक्तीस्थळ आहे..दुखीताचे व पिडीतांचे अश्रृ पुसण्यासाठीच सांगोला तालुक्यात परमेश्वराने धाडलेला दिपक आबा हे देवदुत असल्याची धारणा येथील जनमाणसाची आहे...
चोवीस तास सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात रममान होवुन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिपक आबांची सतत धडपड चालु असते..अगदी लहाण मुलापासुन ते वयोवृध्दापर्यंत दिपक आबा हे सर्वांनाच हवे हवेसे वाटणारे व्यक्तीमत्व ठरले आहे...
अर्थात दिपक आबांच्या या कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या प्रश्नास तडीस घेवुन जाण्याकरीता त्यांना विविध भागामध्ये प्रवास करणे क्रमप्राप्त ठरत आहे..या गतीमान नेतृत्वाचा प्रवास अधिक गतीमान व सुखकर व्हावा म्हणुन तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत लोकवर्गणीतुन नुकताच *"लोकरथ"* अर्पण केला आहे...यातुनच दिपक आबांवर कार्यकर्ते कीती निस्सीम प्रेम करतात याची प्रचिती येते..आपल्या तत्वाशी व विचाराशी दिपक आबांनी कधीही प्रतारणा केली नाही..त्यामुळे आबांप्रती हरएकाची श्रध्दा व निष्ठा अतुट अशीच राहीली आहे..
कार्यकर्त्यांच्या पाठीशी सातत्याने खंबीर पण उभे राहणार्या दिपक आबांना कार्यकर्त्यांनी जो *"लोकरथ"* अर्पण केला यातुन सांगोला तालुक्याचे खरे लोकनेते तथा जननायक दिपक आबा हेच आहेत हे या कार्यकर्त्यांच्या प्रेमातुन सिध्द होते...


0 Comments