Breaking News

सांगोला तालुक्यात लाचखोर प्रवृत्ती गगनाला ; अजून एक लाचखोर तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 सांगोला तालुक्यात लाचखोर प्रवृत्ती गगनाला ; अजून एक लाचखोर तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

हक्कसोडपत्र तयार करून वडिलांच्या शेतजमिनीवर आईचे नाव लावण्याकरिता दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह एक खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. नारायण विठ्ठल खरात हा लाचखोर तलाठी आहे .तो सांगोला तहसील कार्यालय अंतर्गत संगेवाडी तलाठी कार्यालयात कार्यरत आहे .तसेच त्याचा साथीदार हा हि संगेवाडी गावातील २० वर्षीय तरुण आहे .या दोघांना हि ताब्यात घेण्यात आले आहे.


 यातील तक्रारदार यांचे वडील हे मयत झाले असून वडिलांचे शेतजमिनीवर वारसदार म्हणून तक्रारदार, त्यांचा भाऊ व त्यांच्या आईचे नांव लागलेले आहे. या प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी तहसील कार्यालय सांगोला येथून हक्कसोडपत्र तयार करून त्यांचे वडिलांचे शेतजमिनीवर वारसदार म्हणून केवळ त्यांचे आईचे नांव लागावे याकरिता विहित अजसिह हक्कसोडपत्र जोडून सज्जा संगेवाडी येथे अर्ज सादर केला होता.


या प्रकरणामध्ये तक्रारदार हे त्या अनुषंगाने पाठपुरावा करीत असताना यातील आरोपी तलाठी खरात यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना हक्कसोड पत्रानुसार वारसदार म्हणून शेतजमिनीवर तक्रारदार यांचे आईचे नांव लावण्याकरिता २००० रुपये लाचेची मागणी केली व या लाच रक्कम यातील आरोपी खाजगी इसमाच्या मोबाईल क्रमांकाचे फोन पे खात्यावर पाठविण्याबाबत सांगितले होते. 


या प्रकरणामध्ये पडताळणी कारवाई दरम्यान यातील खरात यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणामध्ये सापळा कारवाई दरम्यान यातील तलाठी खरात यांनी रु. २००० लाच रक्कम खाजगी इसम भोरे यांचेकडे देण्यास सांगितली असता इसमाने ती स्वीकारली असता दोन्ही आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर, चंद्रकांत कोळी पोलीस निरीक्षक, लाप्रवि, पोलीस अंमलदार सोनवणे, सण्णके, पकाले, सुरवसे यांनी केली.

Post a Comment

0 Comments