सांगोला नगरपालिकेकडून मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण
सांगोला नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत शहरातील इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थिनींना स्वरक्षणासाठी व मुलींच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी . या हेतूने मोफ़त कराटे प्रशिक्षण हा उपक्रम ऑपरेशन दुर्गा हाती घेतला आहे .
अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेणारी ही राज्यातील पहिली नगरपरिषद असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली . राज्यात नगरपरिषद हद्दीतील महिला व बालक यांच्या कल्याणच्या कार्यक्रमासाठी नागरपरिषदांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या बांधील खर्च वजा जाता उर्वरित रकमेच्या ५ % रक्कम राखून ठेवणे गरजेचे असते .
या ५ % निधीतून दरवर्षी महिलाव बालकांच्या विकासासाठी विविध योजना व कार्यक्रम राबविले जात असतात . परंतू यावर्षी पारंपरिक ठरावीक कार्यक्रमांना फाटा देत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या संकल्पनेतून शहरांतील ५ वी ते ९ वी च्या मुलींच्या स्वरक्षणासाठी मोफत कराटे प्रशिक्षणाचा ऑपरेशन दुर्गा हा नावीन्यपूर्ण व विधायक उपक्रम नगरपरिषदेने हाती घेतला आहे .
सांगोला नगरपरिषदेमार्फत राबिवण्यात येणाऱ्या या नावीन्यपूर्व उपक्रमाला शहरातून उत्तम प्रदीसाद मिळाला असून तब्बल ७५ मुलींच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे . प्रशिक्षण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिभवन येथे १ महिन्यांच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे . १


0 Comments