अग्नीपथ योजना सुरु होणार म्हणजे होणार ! वायूसेनेने जाहीर केली तारीख , लष्करही काढणार दोन दिवसात नोटीफिकेशन !
केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी सुरु केलेल्या अग्नीपथ योजनेला देशभरातून मोठा विरोध सुरु आहे . रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी रेल्वे जाळल्या आहेत . करोडो रुपयांच्या राष्ट्रीय संप्पतीची हानी केली आहे . या तीव्र विरोधानंतरही भारतीय सेना ठाम अग्नीपथच्या अंमलबजावणीवर आहे . स्थलसेनाप्रमुख मनोज पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे .
ही भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठीचे नोटीफिकेशन पुढील दोन दिवसातच काढले जाणार आहे . त्यानंतर भरतीबाबतचा कार्यक्रम जाहीर केला जाईल . डिसेंबर २०२२ पूर्वी अग्रीवीरांच्या पहील्या बॅचचे प्रशिक्षणसुरु होईल . तरुणांना भारतीय सेनेत सहभागी होण्याची मोठी संधी यातून मिळणार आहे , त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन पांडे यांनी केले आहे .वायूसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी यापूर्वीच २४ जूनपासून वायुसेनेतील भरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे .
कोरानामुळे दोन वर्षे कोणतीही भरती झाली नव्हती . त्यामुळे यावर्षी वयाची कमाल मर्यादा २३ वर्षे करण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे . त्यामुळे यावर्षी १७.५ ते २३ वर्षाच्या युवकांना या भरतीत सहभागी होता येणार आहे .युवकांनी या भरतीसाठी तयारी सुरु करावी असे आवाहन लष्कराकडून करण्यात आले आहे .


0 Comments