सोलापूर-अल्पावधीतच तरुणांच्या मनावरती अधिराज्य निर्माण करणारे सांगोला तालुक्याचे युवा नेते डॉ बाबासाहेब देशमुख..
सद्या दिवंगत आबासाहेबांच्या दुःखद निधनानंतर सांगोले तालुक्यातील जनता दुःखाच्या छायेखाली वावरत असताना सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिवंगत मा.गणपतरावजी देशमुख अर्थात आबासाहेबांचे नातु डॉ बाबासाहेब देशमुख हे सांगोल्याच्या जनतेशी संवाध साधण्यासाठी आले. सांगोल्याच्या जनतेचे आबासाहेबांनवरचे अतोनात प्रेम प्रत्यक्षात अनुभवून त्यांनी पंन्नास साठ वर्षे प्रेम करणार्या जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला व त्यांनी आपल्या शिक्षणास पूर्णविराम देऊन आबासाहेबांनवरती प्रेम करणार्या जनतेची मनो भावे सेवा करण्याचा संकल्प केला.
अन बघता बघता सांगोला विधानसभा मतदारसंघातील घराघरामध्ये डॉ बाबासाहेबांचे नाव पोहचले, ज्यावेळेस कोरोनाने थैमान घातले होते तेंव्हा डॉ बाबासाहेब देशमुख यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना आँक्सिजन मिळवुन देणे, बेड मिळवुन देणे तसेच कोरोनातुन मुक्त झालेल्या पेशंटचे दवाखान्याचे बिल सुध्दा कमी करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये डॉ बाबासाहेब देशमुख हे लोकप्रिय झाले आहेत.
त्यांच्या कामाची पध्दती बघुन शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटिल यांनी डॉ बाबासाहेब देशमुख यांच्यावरती पुरोगामी युवक संघटनेची राज्यची जबाबदारी टाकण्यात आली त्यांना पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले. पुरोगामी युवक संघटनेची जबाबदारी अंगावर पडलेनंतर राज्यातील तरुणांमध्ये उत्साह संचारला आहे. विशेषता सांगोला मतदार संघातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
तालुक्यामध्ये कुठलाही कार्यक्रम आसो मी तो सांस्कृतीक कार्यक्रम आसो, सामाजिक कार्यक्रम आसो, लग्न समारंभ, किंवा सुखदुःखाचा कोणताही कार्यक्रम आसो डॉ बाबासाहेब देशमुख हे आवर्जून हजेरी लावतात. तरुण वर्गाशी त्यांचा सोशल मिडीयावरती, फोनवरुन सतत संपर्क ठेऊन आहेत.
डॉ बाबासाहेबांना कधीही केंव्हाही फोन लावा ते ताबडतोब प्रतीसाद देतात त्यामुळे तरुण वर्गाला डॉ बाबासाहेब देशमुख हे आपलेसे वाटतात.त्यांच्या साधी रहाणी, उच्च विचारसरणी व अभ्यासू वृत्ती यामुळे तरुणांच्या मनावरती डॉ बाबासाहेब देशमुख हे अधिराज्य गाजवत असताना दिसत आहेत.
अशी माहिती सांगोला तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांना दिली आहे.


0 Comments