धक्कादायक : ‘फादर्स डे’च्या दिवशीच बाप माणसावर कोसळला दुःखाचा डोंगर, एकुलत्या एका मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
आज ‘फादर्स डे’चं सगळीकडं सेलिब्रेशन होत आहे सगळे मुल मुली आपल्या बाबांसाठी दिपू स्टेटस ठेऊन शुभेच्छा देत असतांनाच अकोल्यात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. तापडिया नगर येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली 21 वर्षीय कृष्णा लक्षण झोरे असे फाशी घेतलेल्या युवकाचे नाव आहे फादर्स डे च्या दिवशी या मुलांने केलेली ही आत्महत्या अतिशय दुःखद असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येत आलेल्या न्यु तापडिया नगर येथील साई हॅटस येथील फ्लॅट नंबर 108 मध्ये झोरे परिवार राहतो वडील रेल्वेत कामाला असून गुण्या गोविंदाने राहणाऱ्या या परिवारात आज फादर्स डे च्या दिवशी कधीही न शमणारे वादळ उठले. शनिवार 18 जून रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास लक्ष्मण झोरे हे रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आनंद बेकरी जवळील किराणा दुकानात पैसे देण्यासाठी गेले असता कृष्णाने आपल्या वडिलांना नोट्स आणण्यासाठी पैसे मागितले व तो सोबत कॉलेज बॅग व दुचाकी क्रमांक एम. एच. 30 बी जे 3665 ने नोट्स आणण्यासाठी गेला तो परत आलाच नाही.
त्याला शोधण्याचा अतोनात प्रयत्न केल्या नंतर देखील कृष्णा न भेटल्याने लक्ष्मण झोरे यांनी 19 जून रोजी रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे कृष्णा हरवल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आगरकर विद्यालयाच्या मागील बाजूस
कृष्णाची गाडी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनेचे गांभीर्य पाहता रामदास पेठ पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले असता आगरकर विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या कॉलेजच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला पोलिसांनी घटनेची माहिती त्वरित झोरे परिवाराला दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला. फादर्स डे च्या दिवशी झालेल्या या घटनेने कृष्णाच्या वडिलान वरती काय आघात घडला असेल याचा विचार न केलेलाच बरा.
कृष्णा हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता तो बि. कॉम. पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. मुलाने नोट्स करीता पैसे मागताच तात्काळ दिले त्यांना याचा कोणताच मागमूस नव्हता की मुलगा परत येणारच नाही. अशातच त्यांच्या कानावर एकुलत्या एका मुलाची फादर्स डे च्या दिवशीच वार्ता कळल्याने परीवारासाठी तत्पर असलेल्या या बाप माणसावर दुःखाचा डोंगर कोसळला एकुलत्या एका मुलाची आत्महत्या ही त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरली. कृष्णाने इंन्स्टाग्राम वर आत्महत्येपूर्वी एक पोस्ट शेअर केल्याचे समजते. कृष्णाने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.


0 Comments