सोलापूर, सांगोला तालुक्याचे भारतीय रेकॉर्ड ब्रेक आमदार “दिवंगत-मा. गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी विकासाच्या गोंडस नावाखाली कधी पक्ष बदलला नाही”..
भारतीय राजकारणामध्ये एकाच पक्षातुन अकरा वेळा निवडुन येण्याचा विक्रम महाराष्ट्रातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे डॉ भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांनी केला आहे.दिवंगत आबासाहेब हे काही काळ मंत्रिमंडळातही होते तरीही त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या पदाचा वापर केला नाही.दिवंगतआबासाहेबांनी मिळालेल पद त्यांनी जनतेच्या विकासासाठी वापरले.अशा पदातुन कधीही पैसा मिळवायचा नसतो,आर्थीक लाभ करुन घ्यायचा नसतो हे त्यांनी भारतीय राजकारणातील नेत्यांना उदाहरणच घालुन दिले होते.
सध्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये जी राजकीय अस्थिरता पहावयास मिळत आहे ती पाहिल्यावर खरच राजकारणाचा खेळखंडोबा झालाय की काय आसे वाटु लागते आहे. सध्याच्या राजकीय अस्थिरतेमागे जरी वेगवेगळळी कारणे असतील तरी त्यातील प्रमुख कारणे ही राजकीय पदे व आर्थीक लाभ हेही कारणे आहेत.अशा बंडाच्यामागे फारमोठे अर्थकारण असते.
गेले दोन ते अडीच वर्षे राज्यामध्ये आघाडी सरकार काम करीत आहे त्यामध्ये प्रमुख तिन घटक पक्ष आहेत या घटक पक्षामधील एका पक्षाची विचारधारा ही अतिशय वेगळी आहे. ती इतर दोन पक्षाशी मिळतीजुळती नाही. हाच मुद्दा गेले अनेक दिवस विरोधीपक्षाने सतत उपस्थित करुन आघाडीतील पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्यास यशस्वी झाले आहेत व यामुळेच काही आमदारांमध्ये बंड करण्यासाठी कारण सापडले तसेच ज्या पक्षाकडे गृह व अर्थ ही महत्वाची खाते असतात त्यापक्षाच्या आमदारांना आपोआपच झुकते माप मिळते व तोच मुद्दा विरोधी पक्षाने बंडखोर आमदारांच्या डोक्यात घालण्याचा अप्रत्यक्षरित्या केलेला प्रयत्नही यशस्वी झालेला आहे.
आता हेच आमदार उघडपणे निधी कमी प्रमाणात मिळत असलेचे उघडपणे बोलु लागले.आणी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत बंड पुकारले आहे.
ही वस्तुस्थिती जरी बंडखोरांच्या दृष्टीने योग्य असली तरी विकास कामे करण्यासाठी मंत्रिपदे व सत्ता याच्या बाजूने आपण असावे मगच विकास करता येतो नाहीतर विकासच होत नाही हे दिवंगत गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी खोडून काढले आहे. सतत विरोधीपक्षात असुनही त्यांनी विकास कामे तालुक्यात आणली आहेत. सभागृहात वेगवेगळ्या आयुधांचा वापर करुन कायदेशीर रीतीने व अभ्यासपूर्ण मांडणी करुन अनेक प्रश्न उपस्थित करुन ते सोडवले आहेत त्यासाठी त्यांनी कधीही विचाराशी तडजोड केली नाही की पक्ष बदलाचा प्रयत्न केल नाही. आगदी पन्नास पंच्चावन वर्षात… कुठलाही निर्णय घेताना ज्या जनतेने आपल्याला निवडुन दिले त्या जनतेशी चर्चा करुन संवाद साधूनच ते कोणताही निर्णय घेत असत.त्यांनी जनतेचा विश्वासघात कधीही केला नाही.
सद्या राजकीय वातावरणात आदर्श-दिवंगत आमदार आबासाहेबांनी विकासाच्या गोंडस नावाखाली पक्ष बदलला नाही किंवा संघटनेची विचारधारा बदलली नाही असा आदर्श आमदार पुन्हा होणे नाही अशी माहीती शेतकरी कामगार पक्ष -सांगोला प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी बोलताना दिली आहे


0 Comments