अजब गजब सरकारी पुढील धंद्यासाठी कुत्री, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससे यावर कोरोना लस..तर लवकरच पावसाळा येत आहे रोगराईत .. निवडणूक आणि पाऊस या शुभ मुहूर्तावर कोरोना आगमन..
देशात सद्या बेरोजगारी, महागाई..इत्यादी समस्या मूळ आत्मनिर्भर देशी जनता असताना मोदी सरकार देश चालवण्यासाठी जवळपास देश विकताना-खाजगीकरण करतांना दोन-तीन वर्षांपासून कोरोना निमित्ताने आता कुठं जनता माणसात आली असताना..
देशात पहिली-दुसरी पासून बूस्टर कोरोना लस लाभार्थ्यां याच काय झालं याचा शोध चालू असून..
मोदी सरकारने आता पावसाळ्यात हमखास सर्दी,पेंडसे,खोकला,इत्यादी आजार लक्षात घेऊन निवडणूक नंतर कोरोना धंदा चालू करण्यासाठी माणसे लहान मुले सोडा …कुत्री, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससे यावर कोरोना लस तयार केेली आहे हे विशेष..
प्राप्त माहितीनुसार-
ही लस आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्सने (NRC) विकसित केली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) एका निवेदनात म्हटलं आहे की, अॅनोकोव्हॅक्स ही प्राण्यांसाठी सार्स-कोव्ह-2 डेल्टा लस आहे. सार्स कोव्हच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारांपासून संरक्षण करण्याची क्षमता या लसीमध्ये आहे. या लसीमध्ये निष्क्रिय सार्स कोव्ह 2 (डेल्टा) अँटिजेन आणि अलहायड्रोजेलचा समावेश आहे.
ही लस कुत्री, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससे यांच्यासाठी सुरक्षित आहे. राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत वाढ, चौथी लाट येणार का? वाचा महत्त्वाचे अपडेट्स आयसीएआर-एनआरसीद्वारे प्राण्यांसाठी विकसित केलेली लस आणि डायग्नोस्टिक किट्सना तोमर यांनी डिजीटल पद्धतीने रिलीज केलं. त्यानंतर तोमर म्हणाले, “शास्त्रज्ञांच्या अथक योगदानामुळे, लसी आयात करण्याऐवजी स्वदेशी लसी विकसित करण्यात आपला देश मानवी कल्याण पेक्षा आता स्वयंपूर्ण झाला आहे अस सांगितले जातंय.
हे खरोखरच मोठं यश आहे.” आयसीएआर ही देशातील प्रमुख कृषी संशोधन संस्था आहे, जी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इक्वीन डीएनए पॅरेंटेज टेस्टिंग किटदेखील केंद्रीय मंत्री तोमर यांनी लाँच केले आहे. ही किट म्हणजे, घोड्यांमधील पालकत्व विश्लेषणासाठी तयार करण्यात आलेलं एक शक्तिशाली जीनोमिक तंत्र आहे. या कार्यक्रमादरम्यान आयसीएआरचे महासंचालक त्रिलोचन महापात्रा, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास सचिव अतुल चतुर्वेदी आणि आयसीएआर उपमहासंचालक भूपेंद्र नाथ त्रिपाठी उपस्थित होते.
तसेच लवकरच कोरोना आगमन तयारी सुरू
यानुसार काल दिलेल्यामाहितीनुसार राज्यात रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतेय. कोरोनाचा धोका वाढतोय. मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. राज्यात मास्कसक्तीही नाही. त्यामुळे वाढत्या दैनंदिन रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काही निर्बंध लावू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई विभाग – मुंबई विभागात मुंबई महापालिका (BMC), ठाणे, ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, पालघर, वसई विरारमहापालिका, रायगड, पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण २७३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
नाशिक विभाग- नाशिक, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, अहमदनगर, अहमदनगर महापालिका, धुळे, धुळे महापालिका, जळगाव, जळगाव महापालिका, नंदुरबार आदी क्षेत्रांत २८ नवे रुग्ण आढळले आहेत.
तर
पुणे विभाग – पुणे, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर, सोलापूर महापालिका, सातारा परिसरात २२३ रुग्ण सापडले आहेत.
कोल्हापूर विभाग – कोल्हापूर, कोल्हापूर महापालिका, सांगली, सांगली महापालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी क्षेत्रात एकूण २४ नवे रुग्ण आढळले आहेत.
औरंगाबाद विभाग – औरंगाबाद, औरंगाबाद महापालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महापालिका क्षेत्रात ३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
लातूर विभाग – लातूर, लातूर महापालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महापालिका आदी भागांत १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
अकोला विभाग – अकोला, अकोला महापालिका, अमरावती, अमरावती महापालिका, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आदी क्षेत्रात ६ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.
नागपूर विभाग – नागपूर, नागपूर महापालिका, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर महापालिका आणि गडचिरोली या भागांत गेल्या २४ तासांत ५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे
बाकी देशात प्रत्येक वस्तू वर महागाई कर वसूल केला जात असताना जनतेसमोर नवीन सरकारी वसूल धंदा समोर येत आहे.बाकी खरं खोटं याचा अजून तपास सुरूच आहे.


0 Comments