Breaking News

मायलेकराचा विहिरीत बुडून मृत्यू

 मायलेकराचा विहिरीत बुडून मृत्यू


दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे मायलेकराचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली.

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे मायलेकराचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.21) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली आहे. ही आत्महत्या दोन दिवसापूर्वी भावकीतील वादाच्या रागातून घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र नेमके कारण समजू शकले नाही. यासंदर्भात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत गुन्हा झाला नव्हता.


जिरेगाव येथील संतोष बापूराव सूर्यवंशी यांच्या पत्नी उज्ज्वला सूर्यवंशी (वय 30) व मुलगा स्वराज सूर्यवंशी या मायलेकरांचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या विहिरीमध्ये फुगून पाण्यावर तरंगताना अढळून आला. उज्ज्वला सूर्यवंशी या मुलगा स्वराजला घेऊन शनिवारपासून घरातून निघून गेल्या होत्या. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेत होते. मात्र मंगळवारी दुपारी त्या मायलेकरांचा मृतदेह विहिरीत अढळून आला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.


याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सूर्यवंशी यांच्या भावकीत वाद झाले होते. या भांडणाची तक्रार देण्यासाठी संतोष सूर्यवंशी त्यांच्या पत्नीसह पोलिस स्टेशनला गेल्या होत्या. मात्र त्यांची तक्रार घेण्यास प्रथम टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या कुटुंबियांनीही तक्रार केल्याने पोलिस व गावातील काही व्यक्तींनी तडजोड करून हे प्रकरण मिटविण्यात आले होते. मात्र, या घटनेनंतर शनिवारी उज्ज्वला सूर्यवंशी व स्वराज घरातून निघून गेल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी दोघांचा मृतदेह विहिरीत अढळून आला. पोलिसांनी मायलेकरांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंड येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. मात्र मायलेकरांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. यासंदर्भातील गुन्हा दुपारी उशिरापर्यंत दाखल झाला नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments