google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अजित पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे विविध चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य; असं काही...

Breaking News

अजित पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे विविध चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य; असं काही...

 अजित पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे विविध चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.


अडीच-अडीचवर्षे मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य; असं काही...


पिंपरी : महाविकास आघाडी  करताना मुख्यमंत्रिपद  अडीच-अडीच वर्षे असे काही ठरले नव्हते. पवारसाहेबांनी  सांगितलं उद्धव ठाकरे  हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. आम्ही ते मान्य केलं, त्यानुसार आम्ही काम करतोय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना सांगितले. त्यांच्या स्पष्टीकरणामुळे विविध चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटनासाठी उपमुख्यमंत्री आज शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी विविध कार्यक्रम उरकून सायंकाळी पत्रकार परिषदेत घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. त्यांनीच स्वतः यावर स्पष्टीकरण दिल्याने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्नच निकाली निघाला आहे.राज्यसभा बिनविरोधसाठी प्रयत्न केले; मात्र मार्ग निघाला नाही : अजित पवारांनी व्यक्त केली खंत


महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली आहेत. त्यावेळी मुख्यंत्रीपदाबाबत चर्चा झाली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडणार, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री, अशा बातम्याही काही सोशल मीडियातून आल्या होत्या. मात्र, त्याला दुजोरा मिळत नव्हता. राष्ट्रवादीतही मुख्यमंत्रीपदावरून वाद असल्याचे बोलले जायचे. खासदार सुप्रिया सुळे यांचेही नाव चर्चिले गेले होते.


 यावर त्यांनीही स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आज खुद्द अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे यापुढे या विषयावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडून द्या; पिंपरी-चिंचवडचे सर्व प्रश्न सोडवतो : अजितदादांनी दिला शब्द!राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत आज दुपारपर्यंत एक अर्ज मागे न घेतल्याने सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 


त्यामुळे बिनविरोध निवडीची गेल्या २४ वर्षांची प्रथा खंडित झाली होऊन राज्यसभेसाठी १० तारखेला प्रथमच निवडणूक होणार आहे. ती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला, पण मार्ग निघाला नाही, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता यावे, यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पण, वरील दोघांना मतदान करू द्यायचे की नाही, याचा निर्णय न्यायालय देईल, असे ते म्हणाले.‘आवताडे गटाला हरवाचायं तर जागेसाठी अडू नका अन्‌ हळकुंडासाठी लगीन मोडू नका...’


आगामी पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती होण्याची शक्यता वर्तवताना जागा वाटपाबाबत आमचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि त्यांचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर बोलणी करतील, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments