विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
सांगोला/प्रतिनिधी - 4 जून रोजी विज्ञान महाविद्यालय सांगोला येथील संगणकशास्त्र विभागातून शिक्षण घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. प्रतिमा पूजनानंतर संगणकशास्त्र विभागाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड झाली त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा कोळवले एच. डी. यांनी केले.
त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड झाली त्या विद्यार्थ्यांनमधील प्रकाश खांडेकर, सचिन नरळे, अमर खिलारे, तनुजा पैलवान या विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर संस्था सदस्य प्रा.डॉ. अशोक शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाव्हणे मा.श्री. चंद्रकांत (दादा ) देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि विदयार्थ्यांनी आपल्या पालकांचे व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे. त्यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी सांगितले सॉफ्टवेअर क्षेत्रात मुलांना खूप संधी आहेत. त्यानंतर संस्था सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी सांगितले कि येथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा शेतकरी कुटुंबामधील असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्लेस करण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने करावा.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. धनाजी भानवसे यांनी केले व सुत्रसंचलन प्रा. शेख एन.एस. यांनी केले. सत्कार समारंभाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. फुले आर ए यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कोळवले एच.डी, प्रा. सरगर बी.आर, प्रा. भानवसे डी.पी, प्रा. निलेश रसाळ, प्रा.शेख जे.यु, प्रा. लवटे पी.एम, प्रा. कोळवले डी.एस, प्रा. शेख एन.एस, प्रा. शिंदे डी.आर, प्रा. देशमुख आर.एन., प्रा. बंडगर एन.एच., प्रा. चव्हाण सी. डी., प्रा.सौ. कसबे एस.व्ही, प्रा.सौ. धुरे एम.डी, प्रा.सौ. मेटकरी एम.एस, प्रा, सौ. माळी पी.आर., श्री. कादरी एम.जे, श्री. गव्हाणे एस.बी, श्री. निसार मुलाणी, श्री दशरथ रणदिवे. श्री. अजय देवकते यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments