Breaking News

चक्क ... शाहजीबापू ना मंत्री करा या विशेष मागणी साठी पारेचे केदार साळुंखे करणार पारे ते मंत्रालय सायकल प्रवास

 चक्क ... शाहजीबापू ना मंत्री करा या विशेष मागणी साठी पारेचे केदार साळुंखे करणार पारे ते मंत्रालय सायकल प्रवास

 शाहजीबापू ना मंत्री करा या विशेष मागणी साठी पारेचे केदार साळुंखे करणार पारे ते मंत्रालय सायकल प्रवास सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि काय झाडी काय डोंगर काय हाटील या डायलॉग संपूर्ण देशाला वेढ लावणारे बंडखोर आमदार शाहजीबापू पाटील यांना येणाऱ्या मंत्रीमंडळात मंत्री पद देऊन सांगोला तालुक्याचा विकास करण्यासाठी संधी द्यावी या मागणी साठी सांगोला तालुक्यातील पारे गावातील बापूप्रेमी शिवसैनिक केदार सांळुखे पारे ते थेट मंत्रालय हा सायकल वरून सुमारे ५०० किमीचा प्रवास करणार आहेत .विशेषतः शाहजीबापू पाटील यांना मंत्रीपद भेटलेतर सांगोला तालुकासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा विकास होणार आहे . शाहजीबापू पाटील यांनी आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी रात्रीचा दिवस केला आहे . त्यामुळे अशा नेतृत्वाला एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्री पदाची जबाबदारी देऊन आमची इच्छा पूर्ण करावे या विशेष मागणी साठी मी उद्या सकाळी पारे गावातील भव्य दिव्य छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन सायकल वरुन प्रवास सुरु करणार आहे .विशेषतः दुपारच्या सत्रात संपूर्ण देशाचे दैवत पंढरी चा विठोबा चे दर्शन घेऊन विठोबा कडे बापू च्या व सरकार च्या संदर्भात आशीर्वाद घेऊन पुन्हा प्रवास सुरू करणार असल्याचे माहिती बापूप्रेमी शिवसैनिक केदार सांळुखे यांनी आमच्या विशेष प्रतिनिधी शी बोलताना दिली

Post a Comment

0 Comments