सासरी येण्यास नकार दिल्याने, पतीने केली पत्नीची हत्या!
नागपूर : नागपूरच्या शिवनगाव फाटा परिसरात पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पती पसार झाला होता. पोलिसांनी नाकाबंदी करत त्याला अटक केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, अंकिता भगत असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचं नाव, तर सचिन भगत असे आरोपी पतीचे नाव आहे. 8 वर्षापूर्वी अंकिताचा सचिनसोबत प्रेमविवाह झाला होता. काही दिवसांच्या संसारानंतर त्यांना दोन मुले देखील झाली. परंतु, त्यानंतर सचिनला दारूचे व्यसन लागले. त्यातच सचिन कुठलाही कामधंदा करत नसल्याने दोघांमध्ये अनेक वेळा भांडणे होऊ लागली.
त्यानंतर, सचिनकडून होणाऱ्या सतत छळामुळे तीन महिन्यांपूर्वी मृत अंकिता ने घर सोडले आणि माहेरी राहायला आली, काही दिवस अगोदर तिने सुरक्षा रक्षकाचे काम सुरू केले. शिवणगाव फाट्यावर सुरू असलेल्या सिमेंट रोड च्या कामावर सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असताना सचिन मोठ्या मुलाला घेऊन अंकिताला भेटायला आला. त्यावेळी सचिनने अंकिताला सोबत घरी चालण्यासाठी तगादा लावला. अंकिताने नकार देताच सोबत आणलेल्या चाकू ने अंकिताच्या पोटावर वार केला. जखमी अवस्थेत अंकिता ला सोडून पळ काढला. दरम्यान, अंकितासोबत काम करणाऱ्या कामगारांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी वेळीच नाकाबंदी करत सचिनला अटक केली.


0 Comments