Breaking News

सोलापूर: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिलेचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह; आत्महत्या कि घातपात ?

 सोलापूर: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिलेचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह; आत्महत्या कि घातपात ?

सोलापूर: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पडीक असलेल्या इमारतीमध्ये एका ७२ वर्षीय महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. संबंधित महिलेने आत्महत्या केली की हा घातपात आहे याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, ही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॉण्ड रायटरचे काम करत होती. या महिलेच्या मुलींनी ओळख पटताच हंबरडा फोडला. मयत महिला ही जुना विडी घरकुल परिसरात राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पाहिले असता महिलेचा मृतदेह आढळून आला.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले असून शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. त्यामुळे सदर महिलेची हत्या झाली की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments