Breaking News

मिरज रेल्वेगेट भुयारी मार्गाचे काम संथगतीने.... प्रस्तावित भुयारी मार्ग अपघातास कारणीभूत ठरणार.?....मार्गाची लांबी व रुंदी वाढविण्याची मागणी

 मिरज रेल्वेगेट भुयारी मार्गाचे काम संथगतीने.... प्रस्तावित भुयारी मार्ग अपघातास कारणीभूत ठरणार.?....मार्गाची लांबी व रुंदी वाढविण्याची मागणी 

 सांगोला (प्रतिनिधी) सांगोला मिरज रेल्वे गेटवर सध्या सुरू असलेल्या भुयारी मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे होऊ घातलेला भुयारी मार्ग लांबी रुंदीस अरुंद असून वळणामुळे तो मार्ग अधिकच धोकादायक असल्याचे दिसून येते या भुयारी मार्गाची रुंदी वाढवून काम जलद गतीने पूर्ण करावे अशी मागणी जनतेतून व्यक्त केली जात आहे.


      रत्नागिरी- नागपूर हा महामार्ग सांगोला शहराच्या बाहेरून गेला आहे त्यामुळे बहुतांश जड वाहतूक या रस्त्याने होणार आहे व वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी व रेल्वेच्या गेट बंद धोरणामुळे, "मिरज रेल्वेगेटचे स्वयंचलित गेट बंद होऊन त्याठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे गेल्या चार  महिन्यापासून मिरज रेल्वेगेट बंद आहे


 या भुयारी मार्गावर एकेरी वाहतुकीसाठी दुहेरी ब्लॉक टाकले आहेत परंतु ते ब्लॉक खुप कमी रुंदीचे आहेत व बोगद्यात लगेच वळण तसेच भिंत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन अपघातास कारणीभूत ठरणार आहे तसेच हा भुयारी मार्ग जमिनीपासून वीस फूट खोल असल्याने त्यात पाणी निश्चित साचनार आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते परंतु ठेकेदारांच्या हलगर्जीमुळे होऊ शकले नाही सध्या दोन्ही दुभाजकाची लांबी व रुंदी आताच वाढवून पाण्याचा निचरा कायमस्वरूपी काढून देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

रेल्वेच्या नवीन धोरणानुसार देशभरात अनेक ठिकाणी रेल्वे गेट बंद करून भुयारी मार्ग करण्याचे काम सुरू आहे त्यानुसार सांगोला मिरज गेटवर गेल्या 4 महिन्यापासून भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. ठेकेदारास सदर मार्गाचे काम तीन महिन्यात काम पूर्ण करावे असे असताना अजूनही काम संथगतीने रेंगाळत असल्याचे दिसून येते हा मार्ग बंद असल्याने म. फुले चौक तसेच बसस्थानक परिसरातील व्यवसाय ठप्प आहेत

 म.फुले चौकातून मिरज रेल्वेगेट कडे जाणारा रस्ता तर सुमसान असतो योग्य नियोजना अभावी या होऊ घातलेल्या भुयारी मार्गाचा नागरिकांना व व्यवसायधारकांना फटका बसणार आहे.
सांगोला शहरातील मिरज रेल्वेगेट च्या भुयारी  मार्गावर सतत वर्दळ असल्याने प्रचंड रहदारी असते प्रस्तावित भुयारी मार्ग 20 फूट खोल असल्याने पावसाळ्यात इतर भागातून बोगद्यातील रस्त्यावर पाणी साचून  वाहतुकीची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे 


त्यामुळे या मार्गाची रुंदी वाढवावी व पाण्याचा निचरा योग्यरीत्या व्हावा अशी तरतूद करावी  असे बोलले जात आहे सध्या काम सुरू असल्याने रुंदी व लांबी वाढविण्याचे काम आताच होऊ शकते अन्यथा परत रेल्वेच्या परवानग्या ,निविदा, ठेकेदार यामुळे विलंब होऊ शकतो  त्यामुळे याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.


भुयारी मार्गात साठलेले पाणी कायमस्वरूपी काढण्यासाठी ओढ्यापर्यत गटारीचे काम सुरू असले  तरी पाणी निचरा सुलभ होणार नाही त्यामुळे सांगोला शहराशी निगडित असणाऱ्या मिरज रेल्वेगेट भुयारी मार्गाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या चार महिन्यापासून मिरज रेल्वेगेट भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक ओढ्यावरील रेल्वेपुल व बायपास रस्त्याने सुरू आहे त्यामुळे गेल्या वर्षभरापूर्वी कसेबसे काँक्रीटीकरण केलेला रस्त्याची पार वाट लागली आहे

Post a Comment

0 Comments