google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आश्चर्यकारक ! सोलापूर जिल्ह्यातील दहा दिवसांचे करडू देतेय दूध !

Breaking News

आश्चर्यकारक ! सोलापूर जिल्ह्यातील दहा दिवसांचे करडू देतेय दूध !

 आश्चर्यकारक ! सोलापूर जिल्ह्यातील दहा दिवसांचे करडू देतेय दूध !

करमाळा : अवघ्या दहा दिवसांचे करडू दूध देत असल्याची विस्मयकारक घटना करमाळा तालुक्यातील पोथरे गावात समोर आली असून याबाबत परिसरात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


निसर्गाचा अद्भुत चमत्कार अनेकदा पाहायला मिळतो आणि माणूस निशब्द होतो. अनेकदा काही शास्त्रीय कारणे असतात पण काही नव्हे ते घडले की तो एक चमत्कार वाटू लागतो. शेळ्यांच्या बाबतीत देखील अनेक प्रकार समोर आले आहेत. शेळीने दोन पायांच्या पिल्लाला जन्म देण्यापासून सहा पायाचे शेळीचे पिल्लू देखील पाहायला मिळाले आहे. करमाळा तालुक्यातील एका शेळीने नुकतेच जन्म दिलेल्या एका पिल्लाने असेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि याकडे चमत्कार म्हणून लोक पाहू लागले आहेत. पोथरे गावच्या परिसरात या घटनेची चर्चा सुरु आहे. शेळी जेंव्हा पिलांना जन्म देते तेंव्हा तिच्या सडातून दूध येऊ लागते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते परंतु अवघ्या दहा दिवसांच्या पिल्लाच्या सडातून दूध येणे हा प्रकार तसा नव्यानेच घडला आहे. 


पोथरे येथील रेवण शिवाजी शिंदे यांच्या एका शेळीने दोन पिलांना जन्म दिला. दहा दिवसांचे वय असताना एक करडू चक्क दुध देताना दिसू लागले आहे. यातील एका कारडाला जन्मताच सुपारीच्या आकाराची कास असल्याचे दिसून आले होते पण त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. हे करडू जसे वाढत होते तसतसे ही कास मोठी दिसू लागली होती. शिंदे यांनी या प्रकाराकडे बारकाईने पाहिले असता दूध देण्याच्या अवस्थेतील ही कास दिसून आली. उत्सुकतेपोटी शिंदे यांनी दूध काढण्याचा प्रयत्न केला असता पिल्लाच्या सडातून चक्क दुध येताना दिसले. 


परिसरात चर्चा !

दहा दिवसांचे करडू दूध देत असल्याची बातमी पसरली आणि पोथरे परिसरात याची जोरदार चर्चा देखील सुरु झाली. अनेकांनी शिंदे यांच्या घरी येवून हे करडू पहिले आणि त्यांना चमत्कार वाटू लागला. दररोज दूध काढावे लागते, नाही काढले तर पिल्लाला त्रास होत असल्याचे शिंदे सांगत आहेत. 


चमत्कार नाही तर ---

आगळीवेगळी घटना पाहून सर्वांना हा चमत्कार वाटत असला तरी हा चमत्कार नसून त्यामागे अन्य काही करणे आहेत. हार्मोन्समधील असंतुलन वाढते तेंव्हा अशा घटना घडतात किंवा अनुवांशिक रोगामुळे देखील असे प्रकार घडतात अशी माहिती तालुका पशु वैद्यकीय अधिकारी प्रवीण शिंदे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments