सांगोला तालुक्यातील पाचपैकी एका बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात वाटंबरे , बलवडी , चिणके बंधारा दुरुस्ती प्रगतिपथावर
सांगोला पुराच्या प्रवाहात माण नदीवरील भरावा वाहून फुटलेल्या सांगोला , सावे , वाटंबरे , बलवडी , चिणके पाच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांपैकी सांगोला ( बेले बंधारा ) , सावे बंधारा दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे , तर वाटंबरे , बलवडी , चिणके बंधाऱ्यात दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत .
येत्या पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे ; अन्यथा पावसाळ्यात पुन्हा बंधारा दुरुस्तीची कामे लांबणीवर पडणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले . ऑक्टोबर २०२० मध्ये माण खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या मुसळधार पावसामुळे सांगोला तालुक्यातून वाहणाऱ्या माण नदीला पूर आला . पुराच्या प्रवाहात चिणके , बलवडी , वाटंबरे , सांगोला , सावे या पाच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या डाव्या उजव्याबाजूकडील भरावे
वाहून गेल्यामुळे फुटले होते . बंधारे फुटल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते . दरम्यान , शेतकऱ्यांनी बंधारे तातडीने दुरुस्त करावेत म्हणून लोकप्रतिनिधींकडेमागणी लावून धरली होती . दरम्यान , पावसाळ्यापूर्वी बंधारा दुरुस्तीची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते ; मात्र ती अद्याप पूर्ण झाली नाहीत . सध्या सांगोला , सावे बंधाऱ्यांचा वाहून गेलेला भरावा पूर्ण करून पिचिंगचे काम सुरू आहे .
वाटंबरे बंधाऱ्याच्या पडलेल्या ( १३.५ मी . लांबीच्या ) भिंतीचे व भरावाचे काम चालू आहे . बलवडी व चिणके बंधाऱ्याच्या डावी व उजव्या गुंतवा भिंती पूर्ण पडल्या होत्या . त्यासाठी खोदकाम ( पाया ) पूर्ण झाले आहे . मध्यंतरी बलवडी , चिणके येथील शेतकऱ्यांनी शेतीचे झालेले नुकसान भरून द्या , मग काम चालू करा , म्हणून दुरुस्तीचे काम अडवले होते . उपविभागीय अधिकारी यांच्यासमवेत शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढल्यानंतर दोन्ही ठिकाणी बंधाऱ्यांची कामे सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे .
चौकट
नदीपात्रात एप्रिलअखेर पाणी असल्यामुळे पाया खोदताना पाणी लागत होते . त्यामुळे काम सुरू करण्यास विलंब झाला . सांगोला व सावे बंधारे दुरुस्तीची ९ ० टक्के कामे पूर्ण झाली आहेत . उर्वरित तिन्ही बंधाऱ्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेतली जातील . - अशोक कांबळे , उपविभागीय अधिकारी , पाटबंधारे उपविभाग , सांगोला
0 Comments