google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांनी ‘टेन्शन’ वाढवलं.. पुन्हा निर्बंध लागणार..?

Breaking News

महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांनी ‘टेन्शन’ वाढवलं.. पुन्हा निर्बंध लागणार..?

 महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांनी ‘टेन्शन’ वाढवलं.. पुन्हा निर्बंध लागणार..?

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. राज्यात आज (शुक्रवारी) सलग तिसऱ्या दिवशी एक हजाराहून (1134) अधिक कोरोना रुग्ण आढळले. दुसरीकडे राज्यातील 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दिवसभरात राज्यात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय..


खरं तर ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात असली, तर राज्यातील 6 जिल्ह्यांनी ‘टेन्शन’ वाढवलंय. त्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 6 जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा राज्याला पत्र पाठवलंय..


केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना हे पत्र पाठवलंय. त्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या वरील 6 जिल्ह्यांमध्ये कोविड टेस्टिंग व लसीकरणावर अधिक भर द्यावा, तसेच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवर अधिक लक्ष द्यावे, असा सल्ला देण्यात आलाय..


राज्यात विशेषत: मुंबईत कोरोना रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात सध्या रोज 1000 पेक्षा जास्त रुग्ण आढळत असून, त्यापैकी फक्त मुंबईतच 700 पेक्षा दैनंदिन रुग्णसंख्या आहे. त्यामुळेच ‘टास्क फोर्स’ पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. नागरिकांनी काळजी न घेतल्यास राज्यात पुन्हा मास्कसक्ती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


मंकीपाॅक्सची दहशत वाढतेय

दुसरीकडे जगातील 30 देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’नं शिरकाव केलाय. जगभरात आतापर्यंत ‘मंकीपाॅक्स’ची 550 पेक्षा जास्त प्रकरणं दिसली आहेत. ‘मंकीपॉक्स’वर नियंत्रण मिळवता येईल, असं सांगणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आता ‘यूटर्न’ घेताना ‘मंकीपॉक्स’वर नियंत्रण मिळवता येईल की नाही, याची खात्री नसल्याचं म्हटलंय.


‘मंकीपाॅक्स’ने जगाची चिंता वाढवलीय.. कोरोनाप्रमाणे ‘मंकीपॉक्स’चीही महासाथ येण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतात अजून तरी ‘मंकीपॉक्स’चा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, तरीही केंद्र सरकार सतर्क झाले असून, ‘मंकीपाॅक्स’बाबत काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने राज्यांना केले आहे…

Post a Comment

0 Comments