' झाडी , डोंगार अन् हाटील ' चं कौतुक सांगणाऱ्या आमदाराची संपत्ती माहितीये का ?
एकनाथ शिंदेंसह शिवसैनिकांचं ऐतिहासिक बंड सध्या चांगलंच चर्चेत आहे. सरकार पडणार की नाही, बंड शमणार काी नाही, असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडलेले आहेत. अशातच सोशल मीडियावर मात्र वेगळंच वारं वाहतंय.झाडी, डोंगार अन् हाटील या तीन शब्दांची जोरदार चर्चा आहे.
काय आहे झाडी, डोंगार अन् हाटील?
राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेतले अनेक नेते त्यांच्यासोबत गेले. गेल्या चार दिवसांपासून ते गुवाहाटीमधल्या एका हॉटेलमध्येच आहेत. या सर्वांपैकीच एका आमदाराची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालीये. हा आमदार आपल्या कार्यकर्त्याला आपण सहिसलामत असल्याचं सांगताना या बंडाचं रसभरीत वर्णन करतोय. आजूबाजूच्या परिस्थितीचं वर्णन करताना हा आमदार सांगतोय की, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओकेमध्ये सगळं!
बापू ५ महिन्यापूर्वी म्हणलेले, "११०० कोटींचा निधी टप्प्यात आहे, नाराज का होऊ ?"
कोण आहे हा आमदार?
सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांची ही ऑडिओ क्लिप आहे. यावरुन आता प्रचंड मीम्स तयार होत आहेत. तसंच गुगलवर शहाजीबापू पाटील कोण, त्यांचा मतदारसंघ कोणता, ते कोणती गाडी वापरतात, त्यांची संपत्ती किती असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
एकनाथ शिंदे गुजरातमध्ये ! देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री घेतली भेट
शहाजीबापू पाटलांची संपत्ती किती?
शहाजीबापूंनी जाहीर केलेल्या संपत्तीच्या आकड्यांनुसार, त्यांच्याकडे १६ लाख किमतीची एक फोर्ड एन्डेव्हर गाडी आहे, जी त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. तर तीन लाख ८० हजार किमतीचं १०० ग्रॅम सोनंही त्यांच्याकडे आहे. स्वतःच्या नावावर ८२ लाख ६१ हजारांची शेतजमीन तसंच इमारती असून पत्नीच्या नावावर २८ लाख २८ हजारांची जमीन आहे. तर २० लाख ४० हजारांची पडीक जमीनही शहाजीबापूंच्या नावे आहे.


0 Comments