Breaking News

खुशखबर… पत्रकारितेत पदवी प्राप्त करण्याची सुवर्णसंधी -

 खुशखबर… पत्रकारितेत पदवी प्राप्त करण्याची सुवर्णसंधी - 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुल अंतर्गत मास कम्युनिकेशन विभागाकडून B. Voc. Journalism (Bachaler of Vocational Journalism) हा पदवी अभ्यासक्रम चालविला जातो.या पदवी अभ्यासक्रमासाठी वर्ष 2022-23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पत्रकारितेचा तीन वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम आहे. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही इयत्ता 12 वी उत्तीर्ण ही आहे.


हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. विद्यापीठात अत्याधुनिक टी.व्ही. आणि रेडिओ स्टुडिओ आहे. हा संपूर्ण कोर्स प्रात्यक्षिकावर आधारित आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर वृत्तपत्रे, टी. व्ही., डिजिटल मीडिया, आकाशवाणी, खासगी एफ. एम. तसेच सरकारी व खाजगी कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरीची संधी मिळते. शिवाय स्वतःचे माध्यमही सुरू करता येते.

माफक शैक्षणिक शुल्क, अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि नव्या युगाचे अत्याधुनिक तांत्रिक ज्ञान ही या कोर्सची खास वैशिष्ट्ये आहेत. आपला प्रवेश आजच निश्चित करा.

सदर कोर्ससाठी कोणतीही Entrance Exam नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश यानुसार थेट प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी ५ जुलै ही अंतिम तारीख आहे.

Post a Comment

0 Comments