सांगोल्याची पूर्वाश्रमीची शिवसेना तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकनाथ शिंदे व आ. शहाजीबापु पाटील यांच्या बंडाला छुपा पाठिंबा आहे की काय अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे
महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी 40 च्या आसपास आमदार बंडामध्ये सहभागी करुन घेतले आहेत त्यामध्ये सांगोलेचे आमदार शहाजीबापु पाटिल यांचाही समावेश आहे शिवसेनेशी बंडखोरी करताना गुहाटीतुन बापुंचा जो फोन रेकॉर्डिंग ऐंकावयास मिळाला त्यामध्ये मुख्य मंत्री उध्दवजी ठाकरे हे विकास कामाच्या फाईलवरती सह्या करीत नाहीत आसे म्हटले आहे
तसेच कॉग्रेसचे आशोक चव्हाण तर कुठलेच काम करीत नाहीत आसेही म्हटले आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व राज्याचे अर्थमंत्री अजीतदादा पवार तर आपल्याकडे कायम रागाने व द्वेषाने वागतात आसे म्हटले आहे तसेच महाआघाडीचे सर्वेसर्वा खा़.शरद पवार साहेब यांच्याबाबत ही अविश्वास व्यक्त केलेलाआहे.
एवढे असुनही सांगोले तालुक्यातील आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांनी चालु असलेल्या घडामोडींबाबत कुठेही चकार शब्द काडलेला नाही की एखादे पत्रक स्टेटमेंट आघाडीच्या समर्थनार्थ दिलेल नाही
त्यामुळे सांगोले तालुक्यातील महाआघाडी अंतस्थ पणे बंडखोरांच्या समर्थनार्थ आहे की काय अशी दबक्या आवाजात कुजबुज चालु आहे असे कीतीतरी दबलेले नेते कार्यकर्ते पुढच्या काही दिवसांत एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार यांच्या समर्थनार्थ उघडपणे बोलतील आसे वाटते


0 Comments