रागाच्या भरात कचरा वेचणाऱ्या तिघांवर फेकले उकळते पाणी; दोघांचा मृत्यू!
पुणे: कचरा उचलण्यासाठी गेलेल्या तीन जणांवर हॉटेलच्या कर्मचाऱ्याने उकळते पाणी फेकले. यामध्ये गंभीर भाजल्याने दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीरावस्थेत रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली असून हॉटेल सील करण्याची तयारीही सुरू आहे. ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती परंतु, मंगळवारी पीडितेच्या मृत्यूनंतर हे प्रकरण उघडकीस आले.
पुण्यातील सासवड परिसरात 25 मे रोजी ही घटना घडली होती. हॉटेलचालक नीलेश उर्फ पप्पू जगताप याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. स्थानिक आमदाराच्या दबावाखाली पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोप लोक करत आहेत. हॉटेलचालक सध्या फरार आहे.
दरम्यान, सासवड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. त्यामुळेच पोलिस हे प्रकरण लपवत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस निरीक्षक कदम यांनी सांगितले की, पप्पू जगताप यांच्या हॉटेलजवळील अहिल्या देवी मार्केटमध्ये तीन कचरा वेचक बसले होते. याचा राग येऊन पप्पू जगताप नावाच्या व्यक्तीने आधी तिघांना काठीने मारहाण केली आणि नंतर त्यांच्या एका कर्मचाऱ्याला त्या तिघांवर उकळते पाणी फेकण्यास सांगितले. गंभीररित्या भाजल्यानंतर आरोपी तिघांना मरणासाठी सोडून तेथून निघून गेला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
0 Comments