शेजाऱ्याचा बांध कोरल्यानंतर होणार 5 वर्षाची शिक्षा ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर ही होणार गुन्हा दाखल
कुरुल :- शेतीची मशागत सध्याच्या परिस्थिती सर्वत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत आहे . मालकाने ट्रॅक्टरने मशागत करताना केव्हाही नजरचुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला सांगितला जातो. यामुळे दोन शेतकरी शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतो .याला काही प्रमाणात ट्रॅक्टरचालक ही जबाबदार असतात. त्यामुळे शेतीची नांगरणी करताना दोन फूट जागा सोडून नांगरणी करावी ,मशागती वरून वाद उद्भवला तर ट्रॅक्टर चालक मालक व शेतकरी यांच्या वर गुन्हा नोंद होऊ शकतो.
तेव्हा ट्रॅक्टर मालकांनी ती जमीन वादग्रस्त आहे .की नाही याची शहानिशा करून मगच नांगरणी करणे हिताचे राहील अन्यथा शेतीचा वाद वाढतील व ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल होऊन पाच वर्षेपर्यंत शिक्षा होऊन ट्रॅक्टर जप्त केला जाऊ शकतो. अशी कायद्यात तरतूद करण्यात आली असल्याचे नोटिस द्वारे कळविण्यात आले आहे.
0 Comments